Sangli Drought Condition : दिड लाख लोकांना रोज टँकरने पाणी, सांगली जिल्ह्यात दुष्काळ गडध

Water Management Sangli : सांगली जिल्ह्यात ७३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून दीड लाखांवर लोकसंखेला रोज टँकरद्वारे पाण्याची सोय करण्यात येत आहे.
Sangli Drought Condition
Sangli Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Drought Condition Sangli : सांगली जिल्ह्याला गतवर्षी 'अल् निनो'च्या प्रभावामुळे पावसाने मोठा फटका फसला. पावसाळ्यात जुलै महिना वगळता जून, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्यात कमी पर्जन्यमान झालेल्या जिल्ह्यांत सांगलीचाही समावेश झाला. यंदा सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे डिसेंबरपासूनच पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

सांगली जिल्ह्यात सध्या ऐंशी गावे टंचाईग्रस्त आहेत. ७३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून दीड लाखांवर लोकसंखेला रोज टँकरद्वारे पाण्याची सोय केली जात आहे. जत व आटपाडी तालुक्यातील ही गावे असून कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यात ४ गावे टंचाईग्रस्त आहेत. तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्याचा फटका जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना बसला आहे. तेथे नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यात मिळून ७३ गावे व ५२९ वाड्यांना गावांना ७५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तीन महिन्यांत टंचाईग्रस्त दुप्पट पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने डिसेंबरमध्येच ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्यावेळीच ऐन उन्हाळ्यात टंचाई तीव्र होणार, अशी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर तीन महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या दुप्पट झाली आहे. पावसाळ्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी जावा लागणार आहे. यादरम्यान टंचाईच्या झळा किती तीव्र होणार, याचीच भीती आहे.

जत तालुक्यातील ६८ गावे व टंचाईग्रस्त आहेत. त्यापैकी ६५ गावांना तसेच ४७९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील एक लाख ४६ हजार ६८४ लोकसंख्या टंचाईने बाधित झालेली आहे. आटपाडी तालुक्यातील ८ गावे व ५० वाड्या टंचाईग्रस्त असून त्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यातील १२ हजार ७४२ लोकसंख्या टंचाईने बाधित आहे. जत तालुक्यात ६६ तर आटपाडी तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खानापूर तालुक्यातील तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एक गाव टंचाईग्रस्त आहे.

Sangli Drought Condition
Sangli Market Committee : शेतकऱ्यांच्या शेतमाल वजनाबाबत तक्रार आल्यास कारवाई, सांगली बाजारसमितीला सूचना

तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे व टँकर

जत : निगडी खु, १ शेड्याळ-१, सिंदूर-२, पांढरेवाडी-२, वळसंग-१, एकुंडी-१, हळ्ळी-१, बसर्गी-१, सोन्याळ-२, सालेगिरी पाच्छापूर-१, कुडनूर-१, वायफळ-१, गुगवाड-१, गिरगाव-१, संख-२, जाडरबोबलाद-१, काराजनगी-१, उमराणी- २, तिकोंडी-२, बेळोंडगी-१, मोकाशेवाडी, टोणेवाडी-१, माडग्याळ-२, सोनलगी-१, मुचंडी-१, जालिहाळ खुर्द, कागनारी, दरीबडची-१, कोळगिरी-१, कोंतेवबोबलाद, लमाणतांडा (दरीबडची)-१, केरेवाडी (कोंतेवबोबलाद)-१, व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी).

दरीकोणूर-१, सिद्धनाथ-१, सुसलाद-१, पांडोझरी-१, सोरडी-१, खोजनवाडी-१, तिल्लेहाळ-१, गोंधळेवाडी-१, अंकलगी-१, मोटेवाडी आसंगी तुर्क-१, भिवर्गी-१, मल्ल्याळ-१, माणिकनाळ-१.५, खिलारवाडी-१.२५, वाषाण-१, बनाळी- १.२५, लकडेवाडी-१, कुळालवाडी-१, जिरग्याळ-१, बालगाव-१, आसंगी जत-२, लवंगा-०.५ कोणबगी-०.७५ जालिहळ बुद्रुक २ बेवनूर-२, कोणीकुणूर-१.५, आसंगी तुर्क-१.७५, बिळूर-२

आटपाडी बोंबेवाडी-१, : आंबेवाडी-१, विठलापूर-१, पुजारवाडी (दिघंची) १, उंबरगाव-१, पिंपरी खुर्द -१, विभूतवाडी-१, पिंपरी बुद्रुक-१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com