Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

Crop Insurance: राज्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nanded News: पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टी झाल्यानंतर ७२ तासांत पीकविमा कंपनीला भरपाईबाबत पुर्वसूचना द्यावी लागते. परंतु मागील २७ सप्टेंबरपासून विमा कंपनीचे पोर्टल बंद असल्याने हजारो शेतकऱ्यांना नुकसानीबाबत कळविता येत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राज्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी काढणी केल्यानंतरही झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी उभे पिकेही अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. या नुकसानीबाबत पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नेसर्गिक आपत्ती व काढणी पश्‍चात नुकसान भरपाई या घटकाअंतर्गत परतावा मिळावा यासाठी पुर्वसूचना देण्याची सुविधा आहे. परंतु पंतप्रधान पीकविमा योजनेचे पोर्टल मागील २७ सप्टेंबरपासून बंद आहे.

यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीला पुर्वसूचना देता येत नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनी तसेच स्थानिक प्रशासन तसेच कृषी विभागाकडे केल्या आहेत.

दरम्यान याबाबत राज्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विनयकुमार आवटे यांनी रविवारी (ता. २९) राज्यात काम करणाऱ्या नऊ विमा कंपनीच्या प्रमुखांना पत्र पाठविले आहे. यात त्यांनी शुक्रवारी (ता. २७) रात्रीपासून विमा कंपनीचे पोर्टल बंद असल्यामुळे शेतकरी सूचना देऊ शकत नाहीत.

या परिस्थितीत जेवढ्या कालावधीसाठी पोर्टल बंद आहे, तो कालावधी नसर्गिक आपत्तीअंतर्गत सूचना देण्यासाठी ७२ तासांची मुदत गृहीत धरला जाणार नाही, सर्व विमा कंपन्यानी नोंद घ्यावी. याबाबत कंपन्यांनी तालुका, जिल्हा प्रतिनिधी यांच्यामार्फत हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु अद्याप कंपनीमार्फत अथवा कृषी विभागाकडून तसा संदेश शेतकऱ्यांना दिला नसल्याची बाब समोर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT