BBF Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

BBF Sowing : अतिवृष्टीतही वाचली ४० हजार हेक्‍टरवरील पिके

Heavy Rain : वरोरा तालुक्‍यात बेडवर लागवड ४० हजार हेक्‍टरवरील पिकांवर याचा कोणताच परिणाम झाला नाही. त्यामुळे दुर्गम जिल्ह्यातील बीबीएफ तसेच बेडवर पीक लागवडीचा हा पॅटर्न चर्चेचा विषय ठरला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Chandrapur News : पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात मॉन्सूनच्या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. हेच शेतात पाणी साचून राहिल्याने मुळकुजचा प्रादुर्भाव होत पिके पिवळे पडली. वरोरा तालुक्‍यात बेडवर लागवड ४० हजार हेक्‍टरवरील पिकांवर याचा कोणताच परिणाम झाला नाही. त्यामुळे दुर्गम जिल्ह्यातील बीबीएफ तसेच बेडवर पीक लागवडीचा हा पॅटर्न चर्चेचा विषय ठरला आहे.

दरवर्षी मॉन्सुनकाळात अनियमित आणि खंडित पर्जन्यमानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. पिके फूल आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत त्याला पाण्याची गरज राहते. नेमका त्याचवेळी पाऊस येत नाही, अशी परिस्थिती दरवर्षी निर्माण होते. अनेकदा तीन ते चार महिन्याची सरासरी दोन ते अडीच महिन्यातच पाऊस गाठतो.

त्या पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षीपासून वरोरा तालुक्‍यात बेडवरील पीक लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्याकरिता दरवर्षी खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधनही केले जाते. विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी त्यासाठी पुढाकार घेत, गावोगावी जागृतीवर भर दिला.

शेतकऱ्यांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या भागातील पीक वाचविण्यात यश आले आहे. वरोरा तालुक्‍यात ३६ हजार हेक्‍टर क्षेत्र असलेल्या कापसापैकी सुमारे २५ हजार हेक्‍टर कापसाची तसेच सोयाबीनखालील क्षेत्र २७ हजार हेक्‍टर असून त्यापैकी सुमारे १५ हजार हेक्‍टरवरील लागवड ही रुंद, सरी वरंब्यावर आहे. साडेतीन बाय एक फूट आकाराचा बेड याकरिता तयार करण्यात आला आहे.

९० दिवसांचा पाऊस पडला ४१ दिवसांत

वरोरा तालुक्‍याचे जून ते ऑगस्ट या कालावधीतील ८१३ मिमि सरासरी पर्जन्यमान आहे. मात्र ४२ दिवसांतच ७८४ मिमि म्हणजे सरासरीच्या ९६.४३ टक्‍के पाऊस पडला आहे.ff

कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पारंपरिकऐवजी बेडवर लागवड केली. चार एकरांवरील सोयाबीन हे अष्टसूत्रीचा वापर करून लावण्यात आले. परिसरात अतिवृष्टी झाली असताना त्याचा कोणताही परिणाम पिकावर झाला नाही. पीक जोमदार असून एकरी उत्पादनात चार ते पाच क्‍विंटल वाढ होईल.
- नत्थुजी तिखट, शेतकरी, धानोली, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यांचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११०० ते १३०० मिमि आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी यावर्षी बीबीएफ तसेच बेडवर लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता मार्गदर्शन आणि प्रशिक्षणावर भर देण्यात आला. त्यातूनच ४० हजार हेक्‍टर क्षेत्र बेडवरील लागवडीखालील आले. अतिवृष्टीच्या काळात हे पीक वाचले आहे.
- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT