Dudhna Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : निम्न दुधनात १६.९५ टक्के पाणीसाठा

Dudhna Water Project : या धरणात गतवर्षी (२०२२) २५ जानेवारी रोजी १४७.१८३ दलघमी म्हणजे ६६.७० टक्के जिवंत पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा १०६.१२९ दलघमी कमी पाणीसाठा आहे.

Team Agrowon

Parbhani News : गतवर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात धरणक्षेत्रातील अल्प पर्जन्यमानामुळे परभणी जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाचे धरण भरले नाही. त्यात बाष्पीभवन, उपसा आदी कारणांमुळे या धरणातील पाणीसाठ्यात दिवसागणिक घट होत आहे.

या धरणात गुरुवारी (ता. २५) सकाळी ६ वाजता ४१.०५ दलघमी म्हणजेच १६.९५ टक्के पाणीसाठा होता. या धरणात गतवर्षी (२०२२) २५ जानेवारी रोजी १४७.१८३ दलघमी म्हणजे ६६.७० टक्के जिवंत पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा १०६.१२९ दलघमी कमी पाणीसाठा आहे. गेल्या महिनाभरात या धरणातील पाणीसाठ्यात ८.१०४ दलघमीने (३.३४ टक्के) घट झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी या धरणावर अवलंबून असलेल्या गावात येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्‍भवू शकते.

निम्म दुधना धरणाचा प्रकल्पीय जिवंत साठा २४२.२०० द.ल.घ.मी आहे. यंदाच्या १ जून रोजी या धरणामध्ये ७७.४३१३४ दलघमी (३१.९७ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. त्या वेळी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तने सुरू होती. डाव्या कालव्याद्वारे १.५९६ दलघमी उजव्या कालव्याद्वारे २.२३९ दलघमी पाणी सोडण्यात आले.

ता. ९ जून रोजी आवर्तने बंद करण्यात आल्यानंतर धरणात २९.४५ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर पाणीसाठ्यातील घट सुरूच राहिली. १५ जुलै रोजी २५.५० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणक्षेत्रातील पावसामुळे १९ जुलैला वाढ होऊन ६५.५७७ दलघमी म्हणजेच २७.० टक्के जमा झाला. त्यानंतर पावसाचा खंड पडल्यामुळे ता. ३ ऑगस्टपासून धरणातील पाणीसाठ्यात घट सुरू झाली.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे या धरणातील पाणीसाठ्यात २८.५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या मॉन्सूनोत्तर पावासामुळे फारसी वाढ झाली नाही. धरण क्षेत्रात १ जूनपासूनपर्यंत ५९० मिलिमीटर पाऊस झाला. त्याआधीच्या वर्षी ७८५ मिलिमीटर पाऊस झाला होता. २०२३ च्या १ जूनपासून एकूण २४.९०७ दलघमी पाण्याचा येवा झाला. बाष्पीभवन व इतर मिळून प्रतिदिन ३.३२ एमएमक्यूब व्यय आहे, तसेच बिगर सिंचन पाणी वापर ०.०३१० दलघमी आहे. धरणातून आवक नाही. व्यय सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT