Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Farmer Help : दुष्काळ, मॉन्सूनोत्तर पावसामुळे बाधितांना ५० हजारांची मदत द्या

Farmer Protest : केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी (ता. १३) पालम येथे शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दुष्काळ व अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रासाठी केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी (ता. १३) पालम येथे शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात पालम तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात यावा. तालुक्यात यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात झालेला अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी सरसकट व संपूर्ण क्षेत्र बाधित क्षेत्र घोषित करण्यात यावे.

जून ते सप्टेंबर २०२३ महिन्यातील पर्जन्यमानाचा विचार करता पालम तालुक्यात दुष्काळ घोषित होणे अपेक्षित होते. परंतु दुष्काळ घोषित करण्यात आला नाही. तालुक्यातील पाच पैकी तीन महसूल मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली त्यापैकी पेठशिवणी व रावराजूर मंडळात २१ दिवसांचा पावसाचा खंड असूनही दुष्काळसदृश परिस्थिती घोषित होण्यापासून वंचित आहे.

तालुक्यात यंदाच्या खरिपामध्ये दुष्काळ घोषित करण्यात येऊन केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून द्यावयाच्या प्रचलित दरापेक्षा (हेक्टरी ८५०० रुपये) अधिक म्हणजे हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.

नोव्हेंबर महिन्यात झालेला अवेळी पाऊस व गारपीट यामुळे खरिपातील कापूस, तूर व रब्बी हंगामातील हरभरा, करडई पिकांच्या नुकसानीसाठी सरसकट व संपूर्ण क्षेत्र बाधित क्षेत्र घोषित करण्यात यावे.

खरीप व रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी या मागणीसाठी हेमचंद्र शिंदे, भगवान कारंजे, गोविंद लांडगे, भागवत शिंदे, विठ्ठल कदम, गोपाळ तुरनर, स्वप्नील निळे, अतुल देशमुख, विष्णू जाधव, विश्वनाथ शिंदे आदी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ः अजित पवार

Maharashtra Sugar Industry: वारेमाप ‘एफआरपी’ची स्पर्धा,आर्थिक बेशिस्त थांबवा

Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या यंत्रांना पेटंट

Farm Relief Delay: कर्जमाफीच्या फाइलवर सही करताना मात्र लकवा मारतो: हर्षवर्धन सपकाळ

Agriculture Minister Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे काम करा: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT