Crop Damage : अवकाळीमुळे १४५ हेक्टरमधील पीक वाया

Post Monsoon Rain : नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने अवघ्या महाराष्ट्राला झोडपले होते. त्यातून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुकादेखील सुटलेला नाही. तालुक्यात अवकाळीने चांगलीच दाणादाण उडवली होती.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Mumbai News : नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने अवघ्या महाराष्ट्राला झोडपले होते. त्यातून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुकादेखील सुटलेला नाही. तालुक्यात अवकाळीने चांगलीच दाणादाण उडवली होती.

शासकीय यंत्रणांनी केलेल्या पंचनाम्याच्या अहवालानुसार तालुक्यातील १४४.८३ हेक्टरमधील खरीप पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले. त्याचा मोठा फटका एक हजार २०१ शेतकऱ्यांना बसला आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : नगर जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडलांत जोरदार पाऊस

तालुक्यात भात, नागली आणि वरई ही तीन मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने यंत्रणांना दिले होते. त्यानुसार कृषी अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी बांधावर जाऊन २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत पावसाने झालेले प्रत्यक्ष संयुक्त पंचनामे केले.

सरकारच्या धोरणानुसार, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान मोखाड्यातील खरीप क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. भाताचे ६६.३२ हेक्टर, नागली १६.९८, वरई ७.९६, उडीद २७.९८ आणि खुरासणीचे २४.३९ असे एकूण १४४.८३ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याची आकडेवारी सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी ए. एल. साळुंखे यांनी दिली.

प्रत्यक्ष नुकसान भरपाईची प्रतीक्षा

‘सरकारी काम आणि वर्षभर थांब’ याचा प्रत्यय जनसामान्यांना येतो. गेल्या वर्षीही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आला होता. आता पंचनामे झालेत, वाढीव मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अधिवेशनात वाढीव मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

Crop Damage
Chana Crop Damage : आठ एकरांतील हरभरा पिकावर शेतकऱ्याने फिरवला नांगर
अवकाळीसारख्या संकटांमुळे हाती आलेल्या घासाचे नुकसान होत आहे. सरकारने नुकसानाची तात्काळ भरपाई द्यावी.
प्रकाश धनके, नुकसानग्रस्त शेतकरी, मोखाडा
सरकारच्या धोरणानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार ५०० रुपयांची भरपाई दिली जाते. मात्र, सदरची मदत तुटपुंजी असून केवळ शेतीवरच कुटुंब असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यांनी वर्षभर कुटुंबांची गुजराण कशी करायची, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई वाढवून देण्यात यावी.
उमाकांत हमरे, नुकसानग्रस्त शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com