Winter Session : शेडनेट व पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करा, अंबादास दानवे यांची विधानपरिषदेत मागणी

Maharashtra Assembly Session : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्यावतीने विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
Ambadas danve
Ambadas danveAgrowon
Published on
Updated on

Ambadas danve on Crop Damage : राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे २२ जिल्ह्यांमध्ये साडे चार लाख हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आंलेली पिके वाया गेली आहेत. तसेच शेतातील शेडनेट मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच पशुधनाची हानी झाली आहे, त्यांना मदत करण्यासाठी कोणत्याही विम्याची तरतूद नाही. त्यामुळे शासनाने शेडनेट व पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.

Ambadas danve
Assembly Winter Session 2023 : सरसकट नुकसान भरपाई द्या! गळ्यात संत्र्याच्या माळा घालून महाविकास आघाडीचे विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला भाव, दुष्काळग्रस्तांना मदत, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आदी प्रश्नांवर महाविकास आघाडीच्यावतीने आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Ambadas danve
Maharashtra Hiwali Adhiveshan : राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष; विरोधी पक्षनेते वड्डेटीवारांची टीका

विधीमंडळाच्या कामकाजाच्या सुरुवातीला विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारचे लक्ष वेधले. मागील काही दिवसांपासून राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे २२ जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर शेडनेड उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शेडनेट व पशुधनासाठी कोणत्याही प्रकारची विम्याची तरतूद नाही. त्यामुळे शासनाने शेडनेट व पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, भरपाई आणि अग्रीम पीक विम्याच्या प्रश्नांवर घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com