Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : नवीन २० महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित

Drought Update : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील मूळ महसूल मंडलांच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन २० महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थती घोषित करून ८ सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील मूळ महसूल मंडलांच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन २० महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थती घोषित करून ८ सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील १३ व हिंगोली जिल्ह्यातील ७ महसूल मंडलांचा समावेश आहे. त्याबाबत महसूल व वन विभागाने शुक्रवारी (ता. १६) शासन निर्णय काढला आहे.

२०२३ च्या जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले आहे अशा मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत ९ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ३९ मंडले, तर हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी १७ मंडले असे दोन जिल्ह्यांतील एकूण ५६ मंडलांचा समावेश आहे.

परंतु या दोन जिल्ह्यांत मूळ महसूल मंडलाच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन महसूल मंडळे निकषात बसत असताना सुद्धा त्यांना दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या मंडळातून वगळण्यात आले होते. त्यामुळे संबंधित मंडलातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर काम करणाऱ्या विविध संघटनांनी वगळलेल्या मंडलाचा दुष्काळसदृश मंडळात समावेश करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

‘अॅग्रोवन’ने देखील याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यामुळे मूळ महसूल मंडलाचे विभाजन झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन, परंतु अद्याप स्वयंचलित हवामान केंद्र नसलेल्या महसूल मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून ८ सवलती लागू करण्यात राज्यशासनाने शुक्रवारी (ता. १६) मंजुरी दिली आहे. या शासन निर्णयानंतर दुष्काळसदृश परिस्थिती घोषित झालेल्या परभणी जिल्ह्यातील एकूण मंडलांची संख्या ५२ व हिंगोली जिल्ह्यातील महसूल मंडलाची संख्या २४ एवढी झाली आहे.

...या आहेत सवलती

जमिनीत महसुलात सूट.

सहकारी कर्जाचे पुनर्गठन.

शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती.

कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.

रोजगार हमी योजनांतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

आवश्यक तथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर.

टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज जोडणी खंडित न करणे.

परभणी-हिंगोली जिल्हा दुष्काळसदृश

परिस्थिती घोषित नवीन महसूल मंडळे

तालुका गावे

परभणी तालुका टाकळी कुंभकर्ण.

जिंतूर तालुका दूधगाव, वाघीधानोरा.

सेलू तालुका मोरेगाव.

मानवत तालुका रामपुरी, ताडबोरगाव.

पाथरी तालुका कासापुरी.

सोनपेठ तालुका शेळगाव, वडगाव.

गंगाखेड तालुका पिंपळदरी.

पालम तालुका पेठशिवणी, रावराजूर.

पूर्णा तालुका कावलगाव.

हिंगोली तालुका खानापूरचित्ता, भांडेगाव.

कळमनुरी तालुका साळवा.

औंढा नागनाथ तालुका सिद्धेश्वर, शिरड शहापूर.

सेनगाव तालुका पुसेगाव, बाभूळगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT