Maharashtra Drought agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : माळशिरसच्या पश्चिम भागात दुष्काळी स्थिती

Drought Condition : परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचा सामना कसा करावयाचा, या प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

Team Agrowon

Malshiras News : परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता वाढत असून, कॅनॉलखालील तलाव वगळता सर्वच बंधारे, तलाव आता कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचा सामना कसा करावयाचा, या प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

माळशिरस तालुक्याची सरासरी ४६५ मिलिमीटर असून, आजअखेर ३०० ते ३२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी झालेला पाऊस हा सातत्याने झाला नाही तसेच या भागातील नाले, ओढे वाहिले नाहीत. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली नाही. झालेल्या पावसाने उभ्या असलेल्या पिकांना केवळ दिलासा दिला.

त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न काही अंशी सुटला होता. बाजरी, मका पीक हाताशी आले, परंतु पाहिजे तसा उतारा मिळाला नाही. आता बंधाऱ्यात, तलावात असणारे पाणी संपत चालल्याने ते कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.

माळशिरस तालुक्यातील शेतीक्षेत्र हे नीरा उजवा कालवा, उजनी कालवा, नीरा नदी व पावसावर अवलंबून आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील फडतरी, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, गिरवी, भांब, रेडे, माणकी, जळभावी, गारवाड, मगरवाडी, बचेरी, शिंगोर्णी यासह डोंगर पायथ्याच्या गावातील शेती क्षेत्र हे संपूर्ण पावसावर अवलंबून आहे.

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने या भागातील लोकांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. तालुक्यात आता भाम, पिंपरी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत. शिंगोर्णी, बचेरी येथे चालू असलेला टँकर मध्ये झालेल्या पावसामुळे बंद करण्यात आला होता. परंतु पुन्हा सुरू करावा लागणार आहे. तशीच परिस्थिती गारवाड, जळभावीसह या डोंगर भागातील गावांची आहे. आता येणाऱ्या नवीन सालात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार, हे नक्की.

१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची शक्यता

आता पाऊसकाळ नसल्याने पाण्याची परिस्थिती आताच भयानक झाली आहे. दोन महिन्यांनंतर पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने आतापासूनच टँकर व चारा छावण्या सुरू करण्याबाबत नियोजन केले तरच तालुक्यातील शेतकरी तारणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT