Drought Condition Marathwada : मराठवाड्यात खरिपाची सुधारित आणेवारी जाहीर, अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत

Marathwada Drought : मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारीनुसार आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले.
Drought Condition Marathwada
Drought Condition Marathwadaagrowon
Published on
Updated on

Maharashtra Drought Condition : राज्यात अल् निनोमुळे अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक तालुक्यांचा समावेश आहे.

मागच्या चार दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने याची पाहणी करून गेली यावर अद्याप अहवाल आल्यास मदतीचे निकष ठरणार आहेत. दरम्यान मराठवाड्यात खरीप हंगामासाठी आणेवारी घोषीत करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारीनुसार आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले. मराठवाड्यात एकूण ५६ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी करण्यास पात्र शेती आहे. परंतु यंदा पाऊसच न झाल्याने फक्त ५० लाख ९७ हजारपेक्षाही जास्त हेक्टरवर पेरणी झाली. तर ४ लाख ७९ हजार ८६६ क्षेत्र पडीक राहिले आहे.

दरम्यान अचानक झालेल्या पावसाने तग धरू लागलेल्या पिकांना अतिपावसाने फटका बसून पिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा मराठावाड्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

यापार्श्वभुमीवर मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावात एकूण ४७.४२ एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

Drought Condition Marathwada
Drought Condition : दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकार उदासीन

मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक १ हजार ६५२ गावांचा अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत आहे.

दरम्यान एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार अपेक्षित मदत निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२३ कोटींची मदत अपेक्षित, जालना ११५ कोटी, परभणी ९ कोटी, हिंगोली १० कोटी, नांदेड ५ कोटी, लातूर १६ लाख, बीड सव्वा लाख, धाराशिव २.५ कोटींचा मदत निधी अपेक्षित आहे.

पैसेवारी कमी आलेली जिल्हानिहाय गावे - छत्रपती संभाजीनगर : १३५६, जालना : ९७१, परभणी : ८३२, हिंगोली : ७०७, नांदेड : १५६२, लातूर : ९५२, बीड : १३९७, धाराशिव : ७१९, एकूण : ८४९६ गावे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com