Water Literacy : दुष्काळाचा सामना करण्यासाठी गावकऱ्यांनी जलसाक्षर होणे आवश्यक

आज घडीला अन्नधान्याची उपलब्धता कोठूनही करता येते; परंतु पाण्याचे दुर्भिक्ष्य मात्र दुष्काळाची तीव्रता आणि प्रभाव अधिक गडद करते.
Water Literacy
Water Literacy Agrowon

डॉ.सुमंत पांडे

Water Shortage : पाणीटंचाईच्या विस्तारित कालावधीमध्ये वेळेवर, पद्धतशीरपणे सामोरे जाण्यासाठी योजना विकसित करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या भारतातील परिस्थितीने दाखविल्याप्रमाणे, इतरांच्या तुलनेत लोकशाहीने दुष्काळ चांगला हाताळला आहे, हे अनुभवातून दिसून आले आहे.

केवळ भारत नव्हे तर उत्तर आफ्रिका, मध्य-पूर्व, पश्चिम आशियायी देश, चीन या देशांमध्ये दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.

दुष्काळ व्यवस्थापनाच्या बाबी :

१.दुष्काळ तीव्रतेचा अंदाज घेणे, त्याचे संक्रमण.

२.दुष्काळ जाहीर करणे.

३.दुष्काळ व्यवस्थापनासाठी प्राधान्यक्रम ठरवणे.

दुष्काळ व्यवस्थापनाच्या धोरणामध्ये विकास आणि अंमलबजावणीसाठी काही आपत्कालीन उपाय योजना करणे गरजेचे असते. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरून निर्धारण करून त्याचे व्यवस्थापन करता येतात.

Water Literacy
World Water Day : लोक सहभागातून नदी प्रदूषणावर मात करणारा गोदावरी नदी संसंद उपक्रम

दुष्काळ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ :

आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक सूचना निर्धारित केल्या आहेत.यानुसार दुष्काळ निवारणासाठी महत्त्वाचे आठ भाग केले असून त्याचे विवरण खालील प्रमाणे आहे.

१. दुष्काळाचे आकलन

२.संस्थात्मक चौकट उभारणे

३.वित्तीय व्यवस्थापन

४.दुष्काळाचे आकलन आणि पूर्व अंदाज.

५.दुष्काळास प्रतिबंध,तयारी आणि पाठपुरावा.

६.मानव संसाधनांची क्षमता बांधणी.दुष्काळ निवारण आणि त्यास प्रतिसाद.

७.दुष्काळ व्यवस्थापन नियोजन.

८.कृती कार्यक्रम.

हवामान केंद्र आणि दुष्काळ :

दुष्काळाने संपूर्ण समाजजीवन ढवळून निघते. अलीकडच्या काळातील तंत्रज्ञानातील बदल, दळणवळण सुविधा, रस्त्यांच्या जाळ्यामुळे अन्नधान्य कोठूनही कमी काळात पोचविता येते.

तथापि पाण्याचे दुर्भिक्ष्य मात्र दुष्काळाची तीव्रता आणि प्रभाव अधिक गडद करते. म्हणून जलव्यवस्थापन आणि जलसाक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे.

१) हवामान बदलामुळे पर्जन्याचे विचलन आणि तापमान वाढ अधिक तीव्र होत आहे,त्यामुळे दुष्काळाचा अभ्यासासाठी सांखिकी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.कारण दुष्काळ जाहीर करताना,विमा क्लेम ठरविताना ही आकडेवारी विचारात घेतली जाते.

पर्जन्यमापन अधिक विस्तारले आहे परंतु गावागावातून एकाच तालुक्यात पर्जन्यात खूप तफावत आढळते, त्यामुळे पर्जन्यमापक यंत्र आणि हवामान यंत्रणा प्रत्येक गावात बसविणे गरजेचे आहे.

Water Literacy
Ground Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीत खालावली

२) प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आता वित्त आयोगाच्या मार्फत पुरेसा निधी असतो. त्याचा वापर करून आधुनिक हवामान केंद्र, पर्जन्यमापक घेणे सहज शक्य होते,त्यासाठी प्रशिक्षण कृषी विभागामार्फत देता येते.

३) मागील १० वर्षांपासून हिवरेबाजार येथे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पाण्याचा ताळेबंद मांडला जातो. त्यानुसार उपलब्ध पाण्यावर पिकांचे योग्य नियोजन केले जाते.

येथे शालेय विद्यार्थी पाणी मोजतात आणि त्याचा ताळेबंद सादर करतात. त्यामुळे हिवरेबाजार गावाला जे जमले ते आपल्याला का नाही जमणार? याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com