Nano Urea and Agricultural Drones Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone Purchase : ड्रोन खरेदीसाठी मिळणार अर्थसाह्य अर्ज करण्याचे आवाहन

Agriculture Drone Technology : ड्रोन खरेदीसाठी मिळणार अर्थसाह्य अर्ज करण्याचे आवाहनकृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत २०२४-२५ साठी ड्रोन खरेदीसाठी अर्थसाह्य या घटकासाठी १०० ड्रोनचा राज्याचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे

Team Agrowon

Beed News : बीड : कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत २०२४-२५ साठी ड्रोन खरेदीसाठी अर्थसाह्य या घटकासाठी १०० ड्रोनचा राज्याचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येतो असे बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या (मानव विरहित वायू यान) वापरास पुरेशा संधी आहेत. विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, विद्राव्य खते फवारणी या बाबी व्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील वापर करता येऊ शकतो. ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते.

त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजने अंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था आदींना ४० टक्के अनुदान रक्कम ४ लाख, कृषी व तत्सम पदवीधर ५० टक्के अनुदान रक्कम ५ लाख, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सिमांतिक/महिला शेतकरी यांना ५० टक्के अनुदान रक्कम ५ लाख, सर्वसाधारण शेतकरी ४० टक्के अनुदान रक्कम ४ लाख मिळू शकेल.

मार्गदर्शक सूचनेनुसार किसान ड्रोन व त्याचे संलग्न जोडणी साहित्य याची जी मूळ/वास्तविक किंमत असेल त्यापैकी जे कमी असेल ते अनुदान रक्कम देय राहील.

शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT