Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation Subsidy : ‘ठिबक’च्या अनुदानाचे सव्वा कोटी रुपये थकित

Drip Set Subsidy : दुष्काळी जत तालुक्यातील एक हजार ७९ शेतकऱ्यांना २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये ठिबक संचासाठीचे अनुदान मिळालेले नाही.

Team Agrowon

Sangli News : केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘प्रति थेंब अधिक पीक’ घेण्यासाठी तुषार, ठिबक सिंचन योजना राबविण्यात येते. मात्र, दुष्काळी जत तालुक्यातील एक हजार ७९ शेतकऱ्यांना २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये ठिबक संचासाठीचे अनुदान मिळालेले नाही.

या शेतकऱ्यांचे एक कोटी तीस लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी गावातील खासगी सावकरांकडून पैसे घेऊन ठिबक संच विक्रेत्यांचे पैसे भागविले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

२० जून शेवटची तारीख आहे. शासन थकित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा करणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरविण्यात येतात. ‘महा-डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड केली जाते.

यानंतर खरेदी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र, तसेच राज्य शासन वितरित करते. मागील काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक’ लागला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही. त्यामुळे या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

अद्याप ‘जीआर’ नाही

‘महा-डीबीटी’च्या माध्यमातून नवीन ठिबक संच जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरले जात आहेत. मात्र, शासनाकडून लाभार्थींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणारा ‘जीआर’ शासनाकडून अद्याप निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत संभ्रमावस्था आहे.

थकलेले अनुदान

राज्य शासनाकडून २०२१-२२ मधील १०३ लाभार्थींच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १२ लाख ३६ हजार, तर २०२२-२३ मधील १९३ लाभार्थींच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २३ लाख १६ हजार रुपये थकले आहेत. केंद्राकडून २०२३-२४ मधील ७८३ लाभार्थींच्या पहिल्या हप्त्यापोटी ९३ लाख ९६ हजार रुपये, असे १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपये थकित आहेत.

तालुक्यातील एक हजार ७९ शेतकऱ्यांना २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये ठिबक संचाचे अनुदान मिळालेले नाही. याची सर्व माहिती पाठविली आहे. या ‘हेड’ला निधी उपलब्ध नसल्याने हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मात्र, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहोत. लवकरच शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध होईल.
प्रदीप कदम, कृषी अधिकारी, जत तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT