MPSC Exam Result agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Exam Result : शेतकरी बापाचे स्वप्न पूर्ण राज्यात पहिला येत लेक बनली उपजिल्हाधिकारी

Sangli : पूजा वंजारी यांचे उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याने त्यांच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Public Service Commission : राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील पूजा अरुण वंजारी यांनी राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. लोकसेवा आयोगाच्या वतीने काल (ता.१८) दुपारी ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

पूजा वंजारी यांचे उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याने त्यांच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पूजा वंजारी या मूळच्या बोरगाव (ता. वाळवा) येथील आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील विद्यालयात झाले. त्यांचे वडील अरुण वंजारी हे शेती करतात, तर आई गृहिणी आहेत. २०१९ ला त्यांची सहायक निबंधक सहकारी संस्था अधिकारीपदी निवड झाली होती. २०२२ मध्ये त्यांनी त्याचा पदभार स्वीकारला होता.

सध्या पूजा वंजारी त्या पुणे येथे साखर संकुल येथे सहायक निबंधक कार्यरत म्हणून आहेत. त्यांची लहान बहीण प्राजक्ता हीसुद्धा मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहे, तर चुलत भाऊ रणजित वंजारी हे सहायक अभियंता सिंचन भवन पुणे येथे कार्यरत आहेत.

पूजा यांनी पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला होता. अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला; मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. सध्या शासकीय सेवेत असल्या तरी उपजिल्हाधिकारी होण्याचे ध्येय बाळगून त्या प्रयत्नशील होत्या. त्यांच्या निवडीबद्दल इस्लामपूर आणि बोरगाव येथे आनंद साजरा करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT