Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water crisis : नांदेडच्या धरणसाठ्यात कमालीची घट

Nanded Water level : नांदेड जिल्ह्यात यंदा जूनमध्ये केवळ तीस टक्केच पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या चांगला पाऊस पडला. परंतू मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मध्यम प्रकल्पात निम्माच पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात अर्धाअधिक पावसाळा संपत आला असताना मध्यम प्रकल्पासह एकूण १०४ प्रकल्पातील पाणीसाठा मात्र निम्म्यावर आहे. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पात ४०६.१६ दलघमीनुसार ५६.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात ५३५.२२ दलघमीनुसार ७३.५१ टक्के पाणीसाठा होता.

नांदेड जिल्ह्यात यंदा जूनमध्ये पावसाअभावी धरणसाठ्यात कमालीची घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता. नांदेड जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पात २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २७.९३ टक्क्यांवर खाली आला होता. यानंतर जुले महिन्यात झालेल्या पावसाने २०० दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढला आहे. सध्या जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात ४०८.१६ दलघमीनुसार ७३.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत १२७.०६ दलघमीनुसार १७.४५ टक्के कमी आहे. यातील नऊ मध्यम प्रकल्पात मात्र हा साठा निम्म्यावर आहे.

सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ६६.८० दलघमीनुसार ८२.६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४८५.२१ दलघमीनुसार ५९.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ३५.८६ दलघमीनुसार ४४.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ६२०.६३ दलघमीनुसार ६४.३७ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT