Satana APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Satana APMC : सटाणा बाजार समितीच्या सभापतिपदी सिंधू सोनवणे

Market Committee Election : बागलाण तालुक्याचे लक्ष लागलेली व गेल्या २१ एप्रिलला कोरमअभावी पुढे ढकललेली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (ता. १५) दोन्ही इच्छुकांना समसमान मते मिळाल्याने अखेर चिठ्ठी टाकून पार पडली.

Team Agrowon

Nashik News : बागलाण तालुक्याचे लक्ष लागलेली व गेल्या २१ एप्रिलला कोरमअभावी पुढे ढकललेली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (ता. १५) दोन्ही इच्छुकांना समसमान मते मिळाल्याने अखेर चिठ्ठी टाकून पार पडली. सभापतिपदी सिंधू संजय सोनवणे (रा. डांगसौंदाणे) या त्यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने निवडून आल्या. तर हरिभाऊ पांडुरंग जाधव (रा. मुंजवाड) हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागलाणचे सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांनी तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी काम पाहिले. येथील बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांमधून सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेस गुरुवारी (ता. १५) दुपारी एकला बाजार समितीच्या मुख्य सभागृहात सिंधू सोनवणे व रवींद्र विठ्ठल सोनवणे (रा. डांगसौंदाणे) या दोघांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले.

तर उपसभापतिपदासाठी हरिभाऊ पांडुरंग जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. श्री. जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले.

सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीची घोषणा जाहीर होताच सिंधू सोनवणे यांच्या समर्थक संचालकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. बाजार समिती आवारातील स्व. दगाजी आजबा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

समान मतदान

अध्यक्षपदासाठी सिंधू सोनवणे व रवींद्र सोनवणे यांच्यात गुप्त मतदान पद्धतीने मतदान झाले. दोघांनाही प्रत्येकी नऊ मते मिळाल्याने काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण तयार झाले होते. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रचलित पद्धतीप्रमाणे दोघांच्याही नावाच्या चिठ्ठ्या पुन्हा मतपेटीत बंद केल्या. बाजार समितीत कांदा खळ्यावर मजुरीसाठी आलेल्या पिंपळनेर येथील मजुराचा पाचवीतील मुलगा चेतन मालुसरे याने बंद पेटीतून सिंधू सोनवणे यांच्या नावाची चिठ्ठी काढली.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभापतिपदी सिंधू सोनवणे निवडून आल्याचे जाहीर केले. सभागृहात राहुल सोनवणे, दिनेश गुंजाळ, किशोर खैरनार, मनोहर बिरारी, प्रमोद बिरारी, डॉ. राहुल सोनवणे, सुरेखा अहिरे, काळू जाधव, निंबा वाजले, विनोद अहिरे, गणेश ठाकरे, दीपक सोनवणे, योगेश रौंदळ, संदीप साळे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT