Satana APMC : सटाणा बाजार समितीत व्यापाऱ्यांची मनमानी

Onion Rate : प्रतवारी व गुणवत्ता असतानाही ६३० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्याने लिलावात बोली लागत नसल्याबाबत वस्तुस्थिती मांडली. याला जबाबदार कोण, असा संताप शेतकऱ्याने व्यक्त केला.
 Satana APMC
Satana APMC Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Satana Agricultural Produce Market Committee : नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १२) कांदा लिलावामध्ये कांद्याची योग्य प्रतवारी व गुणवत्ता असतानाही अपेक्षित न दर मिळाल्याने शेतकऱ्याने आक्रोश मांडला. गुणवत्ता कमी असतानाही कांद्याला १२०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

तर प्रतवारी व गुणवत्ता असतानाही ६३० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्याने लिलावात बोली लागत नसल्याबाबत वस्तुस्थिती मांडली. याला जबाबदार कोण, असा संताप शेतकऱ्याने व्यक्त केला.

शेतकऱ्याने सौदा पट्टी दाखवून घडलेला प्रकार मांडला. याबाबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने बाजार समितीच्या कामकाजावर टीका होत आहे.

एप्रिल व मेमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे काढणी अवस्थेत असलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. साठवून ठेवलेला कांदाही साठवणूक क्षमतेअभावी अडचणीत आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात काही व्यापारी फायदा घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतवारी करून आणलेल्या कांद्याला अवघा ६३० रुपये दर मिळाल्यानंतर सौदापट्टी शेतकऱ्याने दाखवीत मनमानी प्रकार समोर आणला. त्यामुळे शेतीमालाच्या प्रतवारीनुसार कांद्याच्या लिलावात बोली लागते का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 Satana APMC
Nagar APMC Result : नगर बाजार समितीत सत्तेसह प्रतिष्ठा राखली

शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेणे बेकायदा व चुकीचे आहे. व्यापारी मधूनच लिलावातून निघून जातात. भावात कायम तफावत असते. या संदर्भात पणन विभाग म्हणजे सहायक निबंधक,

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व पहाणी करून संचालक मंडळ व प्रशासन यांच्याशी संवाद साधून उणीवा दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- कुबेर जाधव, संपर्क प्रमुख-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

समोर आलेल्या व्हिडिओबाबत चौकशी सुरू आहे. हा प्रकार बाजार समिती संचालक मंडळाने गांभीर्याने घेतला असून यावर तातडीने बैठक होईल आणि त्यानंतर व्यापाऱ्यांची बैठक घेऊन असे प्रकार होणार नाहीत याबाबत तंबी दिली जाईल.
- नरेंद्र आहीरे, सभापती, बाजार समिती, सटाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com