Satana APMC Election : सटाणा बाजार समितीवर यशवंत पॅनेलची बाजी

Cooperative Election : सटाणा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत श्री. यशवंत शेतकरी विकास पॅनलने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवीला.
Satana APMC Election
APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सटाणा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत श्री. यशवंत शेतकरी विकास पॅनलने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवीला. शेतकरी विकास पॅनलला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. स्वतंत्रपणे लढलेल्या व्यापारी गटातील २ जागांसाठी तिरंगी तर हमाल मापारी गटातील एका जागेसाठी चौरंगी लढत झाली. माजी सभापती संजय सोनवणे यांच्या पॅनेलचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. आता सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष आहे.

सटाणा बाजार समितीच्या १८ जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. १३८६ पैकी१३७१ मतदारांनी हक्क बजावला होता. मंगळवारी(ता.१) रोजी रोजी सकाळी ९ वाजता येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली.

ठळक घडामोडी

शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार डॉ. राहुल सोनवणे यांचा अवघ्या एका मताने विजय

सहकारी सोसायटी गटातून रवींद्र सोनवणे यांना सर्वाधिक ३५५ मते

महिला राखीव गटातून सिंधुबाई सोनवणे यांना सर्वाधिक ४४७ मते

डांगसौंदाणे गावातून रवींद्र सोनवणे व सिंधुबाई सोनवणे, कंधाने गावातून प्रमोद बिरारी, मनोहर बिरारी, तर ब्राह्मणगाव येथून सुरेखा अहिरे व विनोद अहिरे या गावांना प्रत्येकी दोन प्रतिनिधी लाभल्याने या गावांमध्ये समर्थकांचा जल्लोष

मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त

Satana APMC Election
Solapur APMC Election : भाजपच्या वरिष्ठांपुढेच तिढा सुटण्याची शक्यता

निवडून आलेले उमेदवार व मिळालेली मते (कंसात संख्या) :

सहकारी संस्थांचा सर्वसाधारण गट : रवींद्र सोनवणे (३५५), राहुल सोनवणे (३४३), दिनेश गुंजाळ (३२५), किशोर खैरनार (३०३), मनोहर बिरारी(२८८), प्रमोद बिरारी(२६८), डॉ. राहुल सोनवणे(२६३).

महिला राखीव गट : सिंधुबाई सोनवणे(४४७) व सुरेखा अहिरे (३०८).

इतर मागासवर्गीय गट : काळू जाधव (२९३).

विमुक्त जाती व भटक्या जमाती गट : निंबा वानले (३१०).

ग्रामपंचायत सर्वसाधारण गट : हरिभाऊ जाधव(२९०) व विनोद अहिरे (२५१).

अनुसूचीत जाती किंवा अनुसूचीत जमाती गट : गणेश ठाकरे (२३७).

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गट : दीपक रौंदळ (२४२).

आडते व व्यापारी गट : दीपक सोनवणे (१५३) व योगेश रौंदळ (१५३).

हमाल व तोलारी गट : संदीप साळे (५२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com