Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : खरेदी न केल्यास कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन : डॉ. अजित नवले

Soybean Rate : राज्यात अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असताना सरकार खरेदीबाबत गांभिर्याने घेताना दिसत नाही. सरकारी खरेदीबाबत पावले उचलली जात नाहीत, मुदत वाढ मिळत नसल्याने बाजारात कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहेत.

Team Agrowon

अहिल्यानगर ः राज्यात अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असताना सरकार खरेदीबाबत गांभिर्याने घेताना दिसत नाही. सरकारी खरेदीबाबत पावले उचलली जात नाहीत, मुदत वाढ मिळत नसल्याने बाजारात कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहेत. सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून मुदत वाढवावी, निधीची उपलब्धता करून द्यावी आणि सोयाबीन आधारभावापेक्षा जास्ती दराने खरेदी होईल याबाबत पावले टाकावीत.

अन्यथा अखिल भारतीय किसान सभेकडून कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला.
राज्यात अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असून सरकारी खरेदीबाबत पावले उचलली जात नाहीत. खरेदीला मुदतवाढ मिळत नसल्याने बाजारात कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे. सोयाबीनला ४८९२ या आधार भावापेक्षा अधिक दर दिला जाईल, असे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन सांगितले होते.

मात्र आता त्याचा त्यांना विसर पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे सरकारने खासकीय खरेदीबाबत तातडीने हस्तक्षेप करून मुदत वाढवावी, निधीची उपलब्धता करून द्यावी आणि सोयाबीन आधारभावापेक्षा जास्ती दराने खरेदी होईल याबाबत पावले टाकण्याची मागणी अजित नवले यांनी केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इसारा नवले यांनी दिला.

डॉ. नवले म्हणाले, ‘‘मोदी की गॅरंटी सांगत महाराष्ट्रातील सर्व सोयाबीन खरेदी केले जाईल आणि त्याला ४८९२ या आधारभावापेक्षा अधिक दर दिला जाईल, असे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन सांगितले होते. आताचे कृषिमंत्रीही हेच सांगत आहेत. मात्र राज्यात सोयाबीनला साडेतीन ते चार हजार रुपयांचा दर मिळत असून या मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. खरेदी केंद्रासमोर रांगा आहेत.

अनेक शेतकऱ्यांकडे निम्म्यापेक्षा अधिक सोयाबीन पडून आहे. त्यामुळे शेतकरी सरकारी खरेदीची मागणी करत आहेत. सरकार केवळ घोषणा आणि आश्वासने देत असून खेरदीसाठी पुरेसी यंत्रणा देत नाही. मुदत वाढवण्यााबत निर्णय घेतले जात नाही, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अखिल भारतीय किसान सभेला कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलनाची वेळ आणू नये,’’ असा इशारा या वेळी नवले यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT