Farmer Loan Waive : पुनर्गठन नको कर्जमाफीची किसान सभेच्या वतीने मागणी

Kisan Sabha Demand : कर्जाचे पुनर्गठन करून त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढविण्यापेक्षा त्या कर्जातून त्यांची मुक्तता करण्यासाठी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली.
Farmer Loan Waive
Farmer Loan WaiveAgrowon

Beed News : जिल्हा दुष्काळ घोषित केला असला, तरी त्याबाबतच्या उपाययोजना अत्यंत तुटपुंज्या आहेत. संपूर्ण पीक बरबाद झाले असल्याने शेतकऱ्यांना घेतलेले पीककर्ज फेडणे अशक्य आहे. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करून त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढविण्यापेक्षा त्या कर्जातून त्यांची मुक्तता करण्यासाठी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली.

टाळ-मृदंगाचा गजर सोबतच पीकविमा अग्रिम, अंतिम पीकविमा यासह इतर प्रश्नांबाबत जागर करणाऱ्या घोषणा देत व फलक घेऊन शेतकरी व किसान सभेचे कार्यकर्ते सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मागण्यासाठी किसान सभेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिंडी रूपात धडक देण्यात आली.

Farmer Loan Waive
Onion Variety : योग्य कांदा जातींची निवड

या संदर्भात किसान सभेच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी प्रशासनाला अवगत करण्यात आले होते. अत्यल्प झालेला पाऊस, कापूस व सोयाबीनचे घसरलेले भाव यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सोडा नांगरणीचा खर्चही वसूल नाही. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बीची आशा नाही.

Farmer Loan Waive
Pocra Scheme : ‘पोकरा’प्रकरणी तारांकित प्रश्‍न

...या आहेत मागण्या

कर्ज पुनर्घटना नव्हे कर्जमाफी द्या

दुष्काळग्रस्तांना एनडीआरएफमधून भरीव मदत करा

गुरांच्या चाऱ्यासाठी गावोगाव चारा डेपो सुरू करा

कोरड्या पडलेल्या तलावाच्या क्षेत्रात चाऱ्यासाठी गाळपेरा परवाना द्या. दुष्काळात करण्यासाठी मजुरांना तगाई म्हणून दरमहा आर्थिक मदत करा

अधिसूचित मंडलांना तत्काळ विमा अग्रिमवाटप करा

सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करण्याचा निर्णय घ्या. सोयाबीन, कापसाला उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव देऊन त्याची शासकीय खरेदी सुरू करा

२०२२ मधील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानापासून वंचित असतील यांच्या अडचणींवर तोडगा काढा

२०२२ मधील सततच्या पावसाच्या नुकसान अनुदानापासून वंचित असलेल्यांना विशिष्ट क्रमांक उपलब्ध करून द्या

दुष्काळ घोषित असल्याने बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लावलेले होल्ड काढा

कर्जवसुली सुरू राहणार नाही याची खबरदारी घ्या

पावसाअभावी वाळत असलेल्या उसापोटी उत्पादकांना मदत द्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com