Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Re-Sowing Crisis : सिन्नरला दुबार पेरणीचे संकट

Rain Issue : अद्याप दमदार पाऊस झालेला नसल्याने तालुक्यातील अनेक नद्या, बंधारे, ओढे, नाले कोरडेच आहेत.

Team Agrowon

Sinnar News : तालुक्यात पावसाने अनेक ठिकाणी ओढ दिल्याने पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नसल्याने तालुक्यातील अनेक नद्या, बंधारे, ओढे, नाले कोरडेच आहेत. धरणसाठ्यातून मिळणारे पाणी कमी झाले आहे.

त्यातच दोन-चार दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पिके करपून जातील, दुबार पेरणीचे संकट ओढवेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष दमदार पावसाकडे लागले आहे.तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास आगामी काळात पुन्हा पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेतीबरोबरच जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासण्याची शक्यता आहे.

शहरासह तालुक्यातील अनेक गावांना अजूनही या धरणात काहीच पाणीआले नसल्याने अनेकांना टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. अनेक भागांत पावसाबरोबरच मिळणाऱ्या पाण्यामुळे शेती व जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याची सोय होत असते. पावसाने ओढ दिल्याने व कधी ढगाळ, तर कधी कडक उन असे नैसर्गिक वातावरण झाल्याने पावसामुळे वाढलेली पाणीपातळी कमी होत गेली.

तालुक्यात काही भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्या भागात असलेले बंधारे, मोठे बंधारे, ओढे, नाल्यांमध्ये पाणीसाठा न झाल्याने ओढे व नाल्यांना अद्याप पाणीच आले नाही. त्यामुळे अनेक भागांतील ओढे, नाले, बंधारे कोरडेच असून त्या भागात अद्याप पाण्याची कमतरता आहे. धरण क्षेत्रातही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाण्यावर अवंलबून असलेल्या अनेक गावच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीदेखील कोरड्या असल्याने गावे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईने बेजार आहेत.

पिके वाया जाण्याची भीती

पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झाला नसून येथील नदी-नाले कोरडेठाक आहे. मका, बाजरी पीक दोन-चार दिवसांत पाऊस न झाल्यास करपून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातात आलेले पीक डोळ्यादेखत जात असताना यांसारखी मोठी शोकांतिका नाही. पाऊस न पडल्यास घेतलेले बियाण्यांचे पैसे कसे परत करायचे. मुलांच्या शिक्षणाला पैसे कुठून आणायचे, याचीच चिंता शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT