Land Dispute : जमिनीची अदलाबदली पडली महागात

Agriculture Land : यशवंत आणि जयराम नावाचे दोन खातेदार शेतकरी एकाच गावात राहत होते. त्यांपैकी जयराम हा फक्त शेती करणारा माणूस होता, तर यशवंत मात्र थोडाफार व्यापार करणारा व व्यवहार माहिती असलेला खातेदार होता.
Agriculture Land
Agriculture Land Agrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : यशवंत आणि जयराम नावाचे दोन खातेदार शेतकरी एकाच गावात राहत होते. त्यांपैकी जयराम हा फक्त शेती करणारा माणूस होता, तर यशवंत मात्र थोडाफार व्यापार करणारा व व्यवहार माहिती असलेला खातेदार होता. दोघांची पण शेती दोन वेगवेगळ्या ठिकाणी होती. एक शेत जवळ होते व एक शेत थोडे लांब होते. अनेक दिवस चर्चा करून यशवंतचे लांब पडणारे शेत जयवंतच्या शेताबरोबर अदलाबदली करता येईल का, याचा तो विचार करू लागला. त्यादृष्टीने महसूल अधिकाऱ्यांकडे चाचपणी करायला पण त्याने सुरुवात केली. सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन अशी जमिनीची अदलाबदली करताना काय काय पाहावे लागेल, याची पण त्यांनी चाचपणी केली.

महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना अदलाबदली करणाऱ्या जमिनी या सारख्याच आकारमानाच्या असल्या पाहिजेत, असे सांगितले. म्हणजे दोन्ही जमिनींचा शेतसारा सारखा पाहिजे असे सांगितले. सब रजिस्ट्रार कार्यालयातील माणसाने दोन्ही जमिनींचा रेडीरेकनरचा दर जवळपास सारखा येईल एवढ्या जमिनीचीच आम्ही अदलाबदल करून देऊ असे सांगितले. पाच लाख रुपये किमतीची जमीन ही चार लाख रुपये किमतीच्या जमिनीबरोबर अदलाबदल होऊ शकणार नाही आणि जमिनीची किंमत वेगवेगळी असेल तर सारख्या किमतीची होईल एवढी जमीन अदलाबदलीमध्ये घेतली पाहिजे असे सांगितले.

Agriculture Land
Land Dispute : मळई जमिनी मिळविण्याचा उलटला डाव

या सर्वांचा विचार करून यशवंतच्या दीड एकर जमिनीबरोबर जयरामची दोन एकर जमीन अदलाबदल करायचा दोघांनी निर्णय घेतला. त्याप्रमाणे अदलाबदलीचा दस्त लिहून काढून सब रजिस्ट्रारकडे नोंदविण्यात आला व सरकारी स्टँप ड्यूटी भरून दस्त अधिकृतरीत्या नोंदविण्यात देखील आला. अदलाबदलीनंतर दोघांची पण आलेली पर्यायी जमीन जवळ असल्यामुळे जमीन कसणे त्यांना सोयीचे गेले. तोपर्यंत या जमिनीबद्दल कोणताही प्रश्‍न निर्माण झाला नाही. थोड्याच दिवसांमध्ये दोन जिल्ह्यांना जोडणारा राष्‍ट्रीय महामार्ग होणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. पूर्वीचा जिल्हे जोडणारा जो जिल्हा रस्ता होता तो आता सहा पदरी होणार होता व त्याची मोठी भूसंपादनाची रक्कम बाजूच्या खातेदारांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली. जयरामने जी दोन एकर जमीन यशवंतला दिली होती ही जमीन नव्या रस्त्याला अतिशय जवळ म्हणजे १५० मीटरवर येत होती. त्यामुळे एक नवीनच परिस्थिती निर्माण झाली.

Agriculture Land
Land Dispute : शहरात शेतजमीन राखणे पडले महागात

यशवंतची जी जमीन जयरामकडे आली होती ती हायवेपासून अतिशय लांब होती व तिच्या किमतीमध्ये कोणताही फरक पडला नव्हता. परंतु जयरामची जी जमीन यशवंतकडे गेली होती तिची किंमत मात्र रात्रीतून अचानक वाढली होती. हा रस्ता होणार असल्याची माहिती यशवंतला असावी असा संशय आता जयरामला वाटू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो पेपरमध्ये आलेली ती बातमी घेऊन भांडायला यशवंतकडे गेला व माझी फसवणूक झाली. हायवे मोठा होणार आहे याची माहिती असल्यामुळेच तू अदलाबदली केलीस शिवाय तुझ्या दीड एकरामागे माझी दोन एकर जमीन तू घेतलीस. तू टाकलेला डाव मला माहीत नाही काय, अशी विचारणा करीत जयराम आणि यशवंतमध्ये भांडण झाले. यशवंतने मात्र आपण दोन वर्षे चर्चा करीत होतो व हायवे रुंद होणार याची मला अजिबात माहिती नव्हती. आता बाजार वाढले त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. योगायोगाने ही गोष्ट घडली असावी असे समजावण्याचा प्रयत्न त्याने केला.

बघता बघता आपसांत चर्चेने झालेल्या या व्यवहाराचे रूपांतर एका खटल्यामध्ये झाले. जमिनीच्या बहुसंख्य व्यवहारामध्ये नंतर झालेल्या घटनांमुळे सुद्धा खटले कसे तयार होतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. आजची परिस्थिती बघून लोक व्यवहार करतात परंतु त्याचा नवा अर्थ परिस्थिती बदलल्यावर शोधण्याचा प्रयत्न करतात व त्यामधूनच असे खटले निर्माण होतात. या बदलत्या परिस्थितीला अनेक वेळेस एखाद्याचा मृत्यू, वारसांचा दृष्टिकोन, नवीन प्रकल्पाची घोषणा, ॲक्सिडेंट अशा अनेक गोष्टीदेखील जबाबदार असू शकतात. वस्तुनिष्ठ निर्णय घेतल्यामुळे असे प्रश्‍न लोकांना टाळता येतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com