Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : शेततळ्यांच्या जोरावर दुबार भातशेती

Farm Pond : भात हे उष्णकटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास पीक जोमाने वाढते.

Team Agrowon

Pen News : तर पाण्याचे मोठे दुर्भिक्ष या क्षेत्रात असल्याने दुबार भातशेती इच्छा असूनही शेतकऱ्यांना करता येत नाही; परंतु बहिरामकोटक गावातील प्रयोगशील शेतकरी दयानंद म्हात्रे यांनी आपल्या शेतातील तलावाच्या पाण्यावर दुबार भातशेतीचा प्रयोग यशस्वी केला.

भात हे उष्णकटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास पीक जोमाने वाढते. खारेपाटातील ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू होतात.

त्‍यामुळे दुबार भातशेती करणे शक्‍य होत नाही; मात्र आता शेततळे खणून शेतकरी दुबार भातपीक घेत आहेत. खारेपाटातील जमीन चिकट असून पाणी शेतात टिकून राहते.

याचा फायदा घेत उन्हाळी शेती करण्याचे ठरवले असून सध्या चांगल्या प्रकारे भातरोप तयार झाल्‍याची माहिती बहिरामकोटक येथील दयानंद म्हात्रे यांनी दिली.

सिंचन क्षेत्राखालील जमिनीचा शिक्का असला तरी खारेपाटात शेतीसाठी काय; पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न वर्षोनुवर्षे प्रलंबित आहे. सरकारकडून सिंचनासाठी पाणी देत आणि खारेपाटाचा परिसर सुजलाम् सुफलाम् करू, अशा पोकळ घोषणा नेहमीच करण्यात येतात. गतवर्षी पावसाळी शेती झाल्यानंतर शेतात पडलेले भाताचे दाणे पुन्हा रुजले. त्या रोपांतून १० किलो भात मिळाला.
- दयानंद म्‍हात्रे, प्रयोगशील शेतकरी, बहीरामकोटक, पेण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT