Paddy Crop Burn : वयोवृद्ध शेतकऱ्याचे अज्ञाताने जाळले धान पिकाचे पुंजणे

Paddy Farming : वय वर्षे सत्तर पण अजूनही हार न मानता चार महिने प्रचंड मेहनत घेत पै पै जमा करीत त्यांनी शेती केली. चारही मुलींच्या संसाराची घडी बसवली.
Paddy Crop
Paddy CropAgrowon
Published on
Updated on

Chandrpur News : वय वर्षे सत्तर पण अजूनही हार न मानता चार महिने प्रचंड मेहनत घेत पै पै जमा करीत त्यांनी शेती केली. चारही मुलींच्या संसाराची घडी बसवली. यंदा पीकही चांगलं झालं. साधारण पन्नास क्विंटल धान होईल आणि ते वर्षभर आपल्या शिदोरीचे साधन होईल, या आशेवर हे दाम्पत्य होते.

मात्र आजची सकाळ मात्र रडविणारी ठरली. झोपेतून उठल्यानंतर बातमी समजली, की तुमच्या धानपिकाचे पुंजणे जळून खाक झाले अन् त्यांना धक्काच बसला. क्षणभराचाही विचार न करता या वृद्ध दांपत्याने शेतात धाव घेतली. पुढील दृश्‍य पाहून त्यांनी टाहो फोडला. त्यांच्या या वेदना बघून उपस्थितांचे डोळे पाणावले. ही घटना आज सकाळी गणेशपिंपरी गावातून समोर आली आहे. पुंजणे जाळणारा तो कंटक कोण याचा तपास आता पोलिस करीत आहेत.

Paddy Crop
Paddy Procurement : डिसेंबरमध्येही भातखरेदी बंद

गोंडपिंपरी लगत असलेल्या गणेशपिंपरी गावातील ऋषी शंकर दुर्गे हे सत्तर वर्षांचे शेतकरी. वय झाले पण आयुष्याचे रहाटगाडगे चालविण्यासाठी त्यांची तीन एकर शेतीच त्यांच्यासाठी मायबाप आहे. याच शेतीच्या भरवशावर त्यांनी आपल्या चारही मुलींच्या संसाराची घडी बसवली. त्यांना एकही मुलगा नाही.

आयुष्याच्या संध्याकाळी पत्नी सुमन व ऋषी हे एकमेकांचे आधार होते. शेतीच त्यांच्या कमाईचे साधन. वय झालं पण शेती करण्याची त्यांनी सोडली नाही. अशात यंदा त्यांनी प्रचंड परिश्रम घेत शेती केली. धानाची कापणी झाली, बांधणीही झाली. साधारणतः पन्नास क्विंटल धानपिकाच दीड लाख रुपयांच्या उत्पन्नाची आशा ठेवीत ते समाधानान झोपी गेले. पण दुसरी सकाळ त्यांना रडविणारी ठरली.

Paddy Crop
Paddy Procurement : आदिवासी विकास महामंडळाकडून ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

कारण कंटकाने त्यांच्या पूर्ण पुंजणेच जाळून टाकले. हा प्रसंग बघताना वयोवृद्ध दुर्गे दांपत्याच्या डोळ्यातील अश्रूंच्या वाहत्या धारा बघून उपस्थित बळीराजांचेही होळे पाणावले. गोंडपिंपरी तालुक्यात धानाचे पुंजणे जाळण्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, भाजप नेते तथा गणेशपिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते सतीश वासमवार यांनी घटनास्थळी भेट दिली. आमदार देवराव भोंगळे यांना या प्रसंगाची माहिती दिली.

त्यांनी दुर्गे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या वेदना जाणून घेत मदतीचे आश्‍वासन दिले. पुंजणे जाळणारा हा कंटक कोण याचीच विचारणा आता केली जात आहे. पोलिसांनी तातडीने चौकशी करून या आरोपीवर कठोर कार्यवाही करावी व अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता गावातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

एका गरीब वयोवृद्ध शेतकरी बांधवाचे तीन एकरांतील दीड लाख रुपयाचे उत्पन्न निघणारे कंटकांनी जाळून टाकले. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने आरोपीला पकडावे. प्रशासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.
- सतीश वासमवार, सामाजिक कार्यकर्ते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com