Sand Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Sand Policy: माफियांकडून वाळू घेऊ नका...

Sand Mafia : महाराष्ट्र दिनापासून सहाशे रुपये ब्रास वाळू विक्रीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Team Agrowon

Nanded Sand Update : महाराष्ट्र दिनापासून सहाशे रुपये ब्रास वाळू विक्रीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा आणि तालुका समित्या स्थापन करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाळू माफियांकडून वाळू घेऊ नये.

शासकीय डेपोतून सहाशे रुपये दराने वाळू मिळणार असल्याने नागरिकांनी शासकीय डेपोतून वाळू घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी केले आहे.

राज्य शासनाने स्वतः वाळू डेपो सुरू करून वाळू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना केवळ सहाशे रुपये ब्रास या दराने वाळू मिळणार आहे. जिल्ह्यात या वर्षी एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नाहीत.

सध्या बाजारात वाळूचे दर तीन ते चार हजार रुपये ब्रास आहेत. त्याचबरोबर प्लॅटरसाठीची लाल पिवळी वाळू ही चार ते पाच हजार रुपये ब्रास आहे. त्यामुळे वाळू सहाशे रुपये ब्रास मिळाली तर सर्वसामान्य नागरिकांचे पैसे वाचणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर वाळू विक्रीसाठी डेपो सुरू करावेत, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.

शासनाने ऑनलाइन व्यवस्था विकसित केली असून, नागरिकांना वाळूची मागणी नोंदवता येईल. सहाशे रुपये ब्रास एवढ्या कमी दरात वाळू खरेदी करता येणार असून, वाहतुकीचा खर्च वाळू खरेदी करणाऱ्या नागरिकांना करायचा आहे. त्यामुळे अवैध किंवा चोरीची वाळू घेऊन चुकीच्या प्रकारांना खतपाणी न घालता शासकीय डेपोतूनच वाळू खरेदी करावी. त्यासाठी सुरुवातीला नागरिकांना ऑनलाइन प्रशिक्षणही देण्यात येईल. शासनाने सरळ आणि वापरायला सोपी यंत्रणा उभी केली असून, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.-
अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Famer Relief Fund: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीचे पैसे थेट खात्यात मिळणार; पॅकेजबाबत अजित पवारांची ग्वाही

ZP Reservation : जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

Crop Damage: 'अतिवृष्टीनं पीक नष्ट झालं, गाव, घर सोडावं लागलं, 'या' दिवाळीत साडी घेणं तर दूरच', गोष्ट एका महिला शेतकऱ्याची

Turmeric Farming : शेतकऱ्यांनी हळदीचे रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्या

Fruit Crop Insurance : सांगलीत ३४४ शेतकऱ्यांनी घेतला फळपीक विमा

SCROLL FOR NEXT