Sangli News : हळद उत्पादनात जगातील देश प्रमुख उत्पादक आहे. हळदीला सर्वाधिक मागणी आहे. शेतकऱ्यांनी हळदीचे रेसिड्यू फ्री तसेच दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड यांनी व्यक्त केले..कसबे डिग्रज येथे मंगळवारी (ता. १४) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज आणि भारत सरकारच्या वाणिज्य आणि निर्यात मंत्रालयाच्या अधिनस्त मसाले मंडळ, विभागीय कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हळद गुणवत्ता सुधार प्रशिक्षण परिसंवाद झाला..Organic Turmeric Farming : हळद पिकात सेंद्रिय शेतीचे महत्त्व .या वेळी मुंबई येथील मसाले मंडळाच्या विभागीय सहायक संचालक विपणन आणि निर्यात डॉ. ममता धनकुटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. श्रीमंत राठोड, हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी, विठ्ठल चव्हाण, प्रशांत पवार, प्रकाश जाधव, धुळदेव खरात, रवींद्र भगत यांच्यासह हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते..श्री. कराड म्हणाले, की सांगलीची हळद प्रसिद्ध आहे. जगाच्या बाजारपेठेतील हळदीची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगलीची हळद जगभरातील बाजारपेठेत विक्रीस पोहोचवली पाहिजे. मुंबईतील विभागीय मसाले मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेत रेसिड्यू फ्री हळदीचे उत्पादन घ्यावे..Turmeric Farming : हळद पिकातील प्रमुख किडींचे नियंत्रण .मनोजकुमार वेताळ म्हणाले, की हळद पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. हळद पिकातील रोग कीड नियंत्रण करणे सोपे होईल, त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळेल. .जिल्ह्यातील शेतकरी एकत्रित येऊन हळद उत्पादक कंपनी स्थापन करावी. त्यामुळे हळदीची निर्यात करण्यास अडचणी येणार नाहीत. तसेच निर्यातीसाठीचे सखोल मार्गदर्शन डॉ. ममता धनकुटे यांनी केले. डॉ. राठोड, डॉ. माळी यांनी विविध वाण, योजना, लागवड पद्धती, सेंद्रिय व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून अंश मुक्त उत्पादनासह यांत्रिकीकरणाची शेतकऱ्यांना माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.