Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : फडणवीस सारख्यांच्या हातात राज्याची सत्ता जाऊ देऊ नका

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस सारख्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्यादृष्टीने ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : ‘विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झाले तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस सारख्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्यादृष्टीने ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे,’ असे सांगत, ‘माजी खासदार संजय पाटील हे उद्योगी आहेत’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

तासगाव येथे शुक्रवारी (ता. १५) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. या वेळी खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सुमन पाटील, अनिता सगरे, डॉ. भारत पाटणकर, वसंतराव चव्हाण आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते श्री. पवार म्हणाले, ‘‘आम्ही निवडणुकीत फक्त जिंकण्यासाठी मतं मागत नाही, आम्ही काम करण्यासाठी मतं मागतो. आमचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मतदान करा, असा आग्रह धरतो. आज ज्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे. ते पैशांचा गैरवापर करत आहेत. निवडणुकीत दुसरं काही नाही फक्त पैसे टाकायचे आणि माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा, हेच या सरकारचे धोरण आहे. या सरकारने काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. पण या कार्यक्रमातील सत्यता पडताळण्याची गरज आहे.’’

श्री. पवार म्हणाले, ‘माजी खासदार संजय पाटील हे उद्योगी आहेत. त्यांची पहिली विधान परिषद आठवते. आर. आर. पाटील एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘विधान परिषदेच्या एका जागेसाठी माझा आग्रह आहे.’ मी म्हटलं, ‘कोणाच्या नावासाठी?’ तर आर. आर. म्हणाले, ‘संजय पाटलांच्या.’ मी म्हटलं, ‘मला पसंत नाही, दुसरं नाव सांगा.’ पण आर. आर. पाटलांनी खूपच आग्रह धरला.

मी म्हटलं, ‘त्यांचा काही भरवसा नाही, ते तुमच्यासोबत राहतील याची खात्री नाही, मग कशाला खात्री धरताय. तर आर. आर. म्हणाले, ‘ते माझ्या भागातील आहेत. काही करा पण माझं एवढं ऐका.’ शेवटी आम्हाला आर. आर. यांचा आग्रह मोडता आला नाही. त्यानंतर संजयकाका पाटील सहा वर्षे आमदार राहिले, ज्या दिवशी आमदारकीच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी भाजपमध्ये गेले. त्यानंतर ते १० वर्षे खासदार राहिले. आता खासदारकी गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदलला.’ याप्रसंगी रोहित पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुमन पाटील, भारत पाटणकर, अनिता सगरे, वसंतराव चव्हाण यांची भाषणे झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Variety : दुर्मीळ भातवाण जपण्यासोबतच कंपनीने साधली प्रगती

Dairy Processing Business : शून्यातून विस्तारलेला काळे बंधूंचा प्रक्रिया उद्योग

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Milk Processing Equipment : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे

Women Empowerment : सनद - महिलांचे जीवनमान सुधारण्याची

SCROLL FOR NEXT