Nar-Par-Girna Project : नार-पार-गिरणा प्रकल्प निवडणुकीत चर्चेत

River Linking Project : खानदेशसाठी महत्त्वाच्या असलेल्या नार-पार-गिरणा प्रकल्पासंबंधी मध्यंतरी किंवा निवडणुकीपूर्वी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.
Nar-Par-Girna Project
Nar-Par-Girna ProjectAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशसाठी महत्त्वाच्या असलेल्या नार-पार-गिरणा प्रकल्पासंबंधी मध्यंतरी किंवा निवडणुकीपूर्वी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. निवडणुकीत हा प्रकल्प खानदेशात सध्या चर्चेत आहे.

या प्रकल्पामुळे आवर्षणप्रवण गिरणा पट्ट्यातील टंचाई व शेती सिंचनासंबंधी पाण्याची अडचण कायमस्वरूपी दूर होईल. या प्रकल्पासाठी खानदेशातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यास प्रकल्प लवकरच हाती घेतला जाईल, असा मुद्दाही चर्चिला जात आहे. यासह पाडळसे (ता. अमळनेर) या निम्न तापी प्रकल्पाचीही चर्चा आहे.

Nar-Par-Girna Project
Nar Par Girna Project : नार-पारची टिंगल करणारे आता श्रेयासाठी पुढे

अनेक वर्षे नार-पार-गिरणा प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. त्यासाठी सर्वेक्षण व अन्य कार्यवाहीदेखील मध्यंतरी झाली होती. नार-पार खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी गिरणा पट्ट्याच आणण्याची ही योजना आहे.

त्यासाठी सात हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नार-पार-गिरणा परियोजनेस शासनाने मंजुरी दिल्याने काम सुरू होईल, याची अपेक्षा आहे. परंतु त्याचे काम गती केव्हा घेईल, हा मुद्दाही आहे. नुकत्याच फैजपूर (ता. यावल, जि. जळगाव) येथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नार-पार-गिरणा प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे.

Nar-Par-Girna Project
Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

अशी आहे योजना

नाशिक जिल्ह्यातील दमणगंगा, नार-पार, अंबिका या नद्यांचे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते. त्याचा उपयोग होत नाही. हे पाणी नद्यांची दिशा पूर्व वाहिनी करून ते गिरणा नदीत किंवा गिरणा पट्ट्यात आणावे. हे पाणी थेट गिरणा नदीवरील धरणांत येईल व बारमाही प्रकल्प भरलेले राहतील किंवा पाण्याची समस्या मिटेल.

गिरणा पट्टा आवर्षणप्रवण आहे. त्यात नाशिकमधील मालेगाव, जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, पारोळा व अमळनेर या तालुक्यांना लाभ होईल. हा भाग आवर्षणप्रवण असल्याने पाण्याची समस्या असते. अनेक वर्षे या भागात दुष्काळ असतो. अधूनमधून पाऊस चांगला होतो. यामुळे या भागात पाण्याचे चांगले स्रोत असावेत, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com