Guardian Minister Dada Bhuse
Guardian Minister Dada Bhuse  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage From Rain : खचून जाऊ नका, सरकार तुमच्यासमवेत : दादा भुसे

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त उमराणे (ता. देवळा) येथे भेट दिली. या वेळी भुसे म्हणाले, की खचून जावू नका. शेतकऱ्यांसमवेत सरकार खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करू. यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल. वादळाचा अंदाज घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय यंत्रणेला देखील दक्ष राहण्याच्या सूचना केल्या.

देवळा तालुक्यातील उमराणे येथील अनुप पवार यांचे कांदा शेडचे नुकसान झाले तर शेड कोसळून देविदास अहिरे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी(ता. १०) सकाळी घटनास्थळी भेट देत अहिरे कुटुंबीयांचे सांत्वन करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी तातडीने पंचनामा करून मदत पोहोचविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. या वेळी आमदार डॉ. राहुल आहेर हे देखील उपस्थित होते.

उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव अहिरे (वय ४० रा. तिसगाव) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गायत्री सूरज देवरे (वय २२) व अभय अजय देवरे (साडे तीन वर्षे) हे जखमी झाले आहेत. वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेड व घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे तातडीने पंचनामे करण्याची सूचना मंत्री भुसे यांनी केली.

खंडित झालेला वीजपुरवठा प्रशासनाला यंत्रणा राबवून तातडीने पूर्ववत करण्याची सूचना भुसे यांनी केली. प्रशासकीय यंत्रणेसह भुसे यांनी घटनास्थळी नुकसानाची पाहणी केली. या वेळी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, तालुका गटविकास अधिकारी भरत वेदे, नायब तहसीलदार बबन अहिरराव, मंडल अधिकारी गजानन डोके, ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण अहिरराव उपस्थित होते.

खासदार भगरे यांच्याकडूनही पाहणी

दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. या वेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल उपस्थित होते. शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई आपत्ती व्यवस्थापनातून करता येईल का? याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करू, तशी तरतूद नसेल, तर समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन भगरे यांनी या वेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vegetable Farming : व्यावसायिक भाजीपाला लागवडीचे नियोजन

Kenya Tourism : केनियामधील शाश्‍वत पर्यटन

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार का?

Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Farmers Death : ऐन पेरणी हंगामात चोवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या

SCROLL FOR NEXT