Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांना मदतीचा मार्ग मोकळा

Heavy Rain Damage : अकोला जिल्ह्यात जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. भरपाईसाठी दोन लाख ५९१ बाधित शेतकऱ्याचा अहवाल तयार करण्यात आला होता.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यात जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. भरपाईसाठी दोन लाख ५९१ बाधित शेतकऱ्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. आता यापैकी एक लाख ६३ हजार १२५ शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली असून या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जुलै महिन्यात १९, २२ आणि २३ तारखांना अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडलांपैकी ३४ मंडले अतिवृष्टीने बाधित झाली होती. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता.

Heavy Rain
Heavy Rain Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन लाख हेक्टरचे नुकसान

संयुक्त पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदत मंजूर करण्यात आली. मात्र, अतिवृष्टीमुळे मदत वितरणाच्या कामात दिरंगाई होत होती. ही दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करा, असे आदेशही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होता. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. तरीही अद्याप ३५ हजारांवर शेतकऱ्यांची माहिती अपलोड व्हायची आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Heavy Rain
Heavy Rain Damage : आपत्तिग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर

दोन हजार शेतकऱ्यांचे नुकसान

अतिवृष्टीचा फटका ६४० गावांतील १ लाख ६१ हजार १३६ हेक्टरवरील कोरडवाहू क्षेत्राला बसला. एका लाख ९७ हजार २८९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. बागायती क्षेत्रात अतिवृष्टीचा फटका ६८७ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांना फटका बसला. ५२ गावांमधील एक हजार ७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे १६५ गावांतील २ हजार ७३४.८५ हेक्टरवरील फळ पिकांची हानी झाली. दोन हजार २३१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

तालुकानिहाय सादर झालेली माहिती

तालुका बाधित शेतकरी शासनाकडे सादर

अकोला ५९२९९ ४२५४३

अकोट २२४४ १७९७

बार्शीटाकळी ४१५६९ ३५९९१

तेल्हारा ३८१७३ ३४५३१

बाळापूर ४३४०३ ३४५४५

पातूर ४४ ४४

मूर्तिजापूर १५८५९ १३६७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com