Doctor Aaplya Dari Agrowon
ॲग्रो विशेष

Doctor Aaplya Dari : वाशीममध्ये जनावरांच्या उपचारासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम

Veterinary Treatment : शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पुरेसे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी नसल्याची सर्वत्र ओरड होत असते. शासकीय सुविधा मिळत नसल्याने खासगी व्यक्तींकडून सेवा घ्याव्या लागतात.

Team Agrowon

Washim News : शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पुरेसे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी नसल्याची सर्वत्र ओरड होत असते. शासकीय सुविधा मिळत नसल्याने खासगी व्यक्तींकडून सेवा घ्याव्या लागतात.

वाशीम जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पशुपालकांना ऐन पेरणीच्या हंगामात दिलासा देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या पुढाकारात निर्णय घेत आजारी पडलेल्या पशुंवर उपचार करण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही मोहिम सुरु केली आहे.

हा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक ८२७५८ ६८८०० जारी करण्यात आला. आठवड्यातील सातही दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या क्रमांकावर संपर्क केल्यास डॉक्टर पशुपालक शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये श्रेणी एकचे १७ आणि श्रेणी दोनचे ४१ दवाखाने आहेत. काही दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिकारी आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांची पदे रिक्त असून त्यांचा प्रभार इतर डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. तरीही उपलब्ध डॉक्टर त्यांच्या क्षमतेप्रमाणे आजारी जनावरांना घरपोच सेवा देणार आहेत.

हेल्पलाइन सेवा अशी कार्य करणार

पशुपालकांनी हेल्पलाइन नंबरवर संपर्क केल्यास जिल्हा परिषद कक्षामार्फत संबंधिताचे तपशील नोंदविण्यात येतील. हे तपशील संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर यांच्याकडे पाठवण्यात येतील. यानंतर डॉक्टर पशुपालकांशी संपर्क करून पुढील कार्यवाही करतील.

आजाराची ही लक्षणे दिसल्यास फोन करा

दगडी कास, स्तनदाह, जार अडकणे, कठीण प्रसुती ‍ किंवा जन्म देण्यास बाधा, मायांग बाहेर पडणे, अपघात, सर्पदंश, विषबाधा ई. गंभीर आजाराची लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने पशुपालक शेतकऱ्यांच्या हितासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या उपचारासाठी या सेवेचा लाभ घ्यावा.
वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT