Snakebite : सर्पदंश रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय; पाच राज्यांसाठी जारी केला हेल्पलाइन नंबर

Helpline Number For Snakebite : देशात सर्पदंश मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक असून सुमारे ५०,००० लोकांचा सर्पदंशामुळे मृत होतो. यामुळे सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृती योजना लागू करत दिल्लीसह पाच राज्यांसाठी एक हेल्पलाइनही जारी केली आहे.
Snakebite
Snakebite Agrowon

Pune News : देशातील विविध भागात सर्पदंश झाल्याने कोणाचा ना कोणाचा मृत्यू होतो. तर अनेकांना सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळतात. पण अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे अनेकांना त्यांचे प्राणगमवावे लागले आहेत. देशात सुमारे ५०,००० लोक हे सर्पदंशामुळे मृत झाल्याचे एका आभ्यासात समोर आले आहे.  यामुळे सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृती योजना लागू करत दिल्लीसह पाच राज्यांसाठी हेल्पलाइन मंगळवारी (ता. १२) जारी केली आहे. या राष्ट्रीय कृती योजनेत पुद्दुचेरी, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश आणि दिल्ली येथे हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. 

देशात सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लभात घेऊन सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. यासाठी राष्ट्रीय कृती योजना आखण्यात आली असून मंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी पाच राज्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला. या योजनेच्या शुभारंभानंतर चंद्रा म्हणाले, या उपक्रमाचे उद्दिष्ट वैद्यकीय सेवा आणि माहिती सामान्य लोकांपर्यंत जलद पोहोचणे ती सुनिश्चित करणे आहे. तसेच २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी करण्याचे लक्ष्य आमचे आहे.

Snakebite
Bogas Seed Whatsapp Number: कृषिमंत्री मुंडेंनी जाहीर केला शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबर; बोगस बियाणे, खताबाबत करू शकता थेट तक्रार

वन हेल्थ उपक्रमांतर्गत सरकारने हा कृती आराखडा तयार केला असून दिल्लीसह, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांत सर्पदंश झाल्यास लोकांनी १५४०० या हेल्पलाइन नंबर तात्काळ संपर्क करा असे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव चंद्रा यांनी केले आहे. 

याशिवाय सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे याबाबत माहिती देणारी पुस्तिका सरकारने जारी केली आहे. याशिवाय रेबीज कंट्रोल करण्यासाठी देखील नॅशनल रेबीज कंट्रोल वेबसाइट सुरू करण्यात आल्याची माहिती चंद्रा यांनी दिली आहे. या नॅशनल रेबीज कंट्रोल वेबसाइटवर राज्यांना प्राणी चावणे आणि रेबीजशी संबंधित माहिती नोंदवावी लागेल. यामुळे रेबीज प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी अँटी-रेबीज क्लिनिक आणि संसर्गजन्य रोग रुग्णालयाचे मूल्यांकन करण्यात देखील मदत होईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव चंद्रा यांनी म्हटले आहे.

Snakebite
Agriculture Helpline : ‘कृषी तक्रार हेल्पलाइन’ वर तक्रारींचा होतोय पाऊस

सरकारने जारी केलेल्या पुस्तिकेत काय आहे?  

१) पीडितेला जास्त दबाव किंवा घाबरू देऊ नका.

२) सापावर हल्ला करण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास साप तुम्हाला स्वसंरक्षणार्थ चावू शकतो.

सरकारने जारी केलेल्या पुस्तिकेत काय आहे?  

३) सर्पदंशाची जखम कापू नका किंवा जखमेवर अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन किंवा औषध लावू नका.

४) जखमेवर बांधून रक्ताभिसरण थांबवण्याचा प्रयत्न करू नका.

सरकारने जारी केलेल्या पुस्तिकेत काय आहे?  

५) रुग्णाला त्याच्या पाठीवर झोपायला लावू नका कारण यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.

६) पारंपारिक पद्धतींनी उपचार करण्याचा प्रयत्न करू नका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com