Edible Oil Rate agrowon
ॲग्रो विशेष

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : आयात शुल्क कमी असताना देशात तब्बल ३० लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली आहे. हा साठा सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर ४५ ते ५० दिवसांची गरज भागविण्यास पुरेसा आहे. परिणामी, आयात शुल्क वाढीच्या कारणाआड प्रक्रिया उद्योजकांनी खाद्यतेलाच्या दरात वाढ करू नये, अशी सूचना वजा निर्देश केंद्रीय खाद्य तसेच सार्वजनिक वितरण विभागाकडून देण्यात आले.

केंद्रीय खाद्य तसेच सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोपडा यांच्या अध्यक्षतेत सॉल्वेट एक्‍स्ट्रॅक्‍शन असोसिएशन ऑफ इंडिया (एसईएआई), इंडियन वेजिटेबल ऑइल प्रोड्यूसर असोसिएशन (आईवीपीए) आणि सोयाबीन ऑइल प्रोड्यूसर असोसिएशन (एसओपीए) यांच्या प्रतिनिधींची बैठक दिल्लीत पार पडली.

या बैठकीत कमी आयात शुल्काच्या काळात आयात केलेल्या तेलाची विक्री होईस्तोवर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ करू नये, अशी तंबी उद्योजकांना देण्यात आली. कमी आयात शुल्क असताना आयात केलेल्या खाद्यतेलापैकी सुमारे ३० लाख टन साठा सद्यःस्थितीत शिल्लक असून, देशाची ४५ ते ५० दिवसांच्या खाद्यतेलाची गरज याद्वारे भागविणे शक्‍य आहे. परिणामी सण-उत्सवांचा कालावधीत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ न झाल्याने सामान्यांसाठी तो मोठा दिलासा ठरेल, असा विश्‍वास संजीव चोपडा यांनी व्यक्‍त केला.

आयात शुल्कात वाढ करण्यात आली असली तरी जागतिकस्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होतात. दर कमी झाल्यास त्याचाही फायदा खाद्यतेल ग्राहकांना मिळेल, यावर देखील उद्योजकांनी भर द्यावा, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्‍त करण्यात आली.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क वाढ

बाजारात नव्या हंगामातील सोयाबीनची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बाजारात दराची पडझड रोखण्यासाठी सोयाबीन तेल, कच्चे पाम तेल, सूर्यफूल तसेच रिफाइंड सोयाबीन तेलावर १२.५ टक्‍के असलेल्या सीमाशुल्कात वाढ करून ती ३२.५ टक्‍के करण्यात आली आहे. त्यामुळे रिफाइंड तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्‍के झाले आहे. हा निर्णय केवळ तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी घेण्यात आला, अशी स्पष्टता भूमिका संजीव चोपडा यांनी बैठकीत मांडली.

केंद्राच्या सूचनेनंतरही वाढ

देशात कमी आयात शुल्काच्या काळातील ३० लाख टन साठा शिल्लक असून, त्याद्वारे देशाची ४५ ते ५० दिवसांची खाद्यतेलाची गरज भागणार आहे. परंतु त्यानंतरही आयात शुल्क वाढीचा फायदा घेत देशभरात सोयाबीनसह इतर सर्वच तेलांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सोयाबीन तेल १०५ रुपयांवरून १३० रुपये प्रति किलोप्रमाणे विकले जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी केंद्राच्या निर्देशाला ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणीचे नियोजन

Fraud of Farmers : फसवणूक टाळण्याचा कायदेशीर मार्ग

Retreating Monsoon : परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता

PDKV : ‘पंदेकृवि’चा चेहरामोहरा बदलतोय

SCROLL FOR NEXT