Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahavitaran : महावितरणच्या चाकण उपविभागाचे विभाजन

Electricity News : महावितरणकडून चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : महावितरणकडून चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने चाकण उपविभागाचे महावितरणने विभाजन केले आहे. या नव्याने स्थापित केलेल्या चाकण एमआयडीसी उपविभागांतर्गत वासुली व निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे.

नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण ३६ तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली असून मार्च महिन्यात ही कार्यालये सुरू होतील. महावितरणच्या राजगुरुनगर विभागामध्ये सध्या चाकण, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ आणि राजगुरुनगर असे पाच उपविभाग आहेत.

यात चाकण उपविभागांतर्गत एकूण पाच शाखा कार्यालये आहेत. चाकण उपविभागातील १ लाख १३ हजार ग्राहकांमध्ये चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे ७ हजार ८०० उच्च व लघुदाबाचे उद्योग आहेत.

चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील प्रामुख्याने किंग्फा व युंदाई २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन गेल्या डिसेंबरमध्ये एकाचवेळी कार्यान्वित करण्यात आले आहे.

४२ हजार ३०३ ग्राहक असणार

आता चाकण उपविभागाचे विभाजन करून नवीन चाकण एमआयडीसी उपविभाग तयार करण्यात आला आहे. नव्या रचनेत पूर्वीच्या चाकण उपविभागात (कंसात ग्राहकसंख्या) चाकण शहर (२७६५४), भोसे (१०७४६), आळंदी शहर (२३७५९) आणि आळंदी ग्रामीण (८३१५) ही चार शाखा कार्यालये व एकूण ७० हजार ५७४ ग्राहकसंख्या असेल. तर नव्या चाकण एमआयडीसी उपविभागात चाकण ग्रामीण (१९१६३), वासुली (८२०६), निघोजे (१४९३४) हे तीन शाखा कार्यालय व एकूण ४२ हजार ३०३ ग्राहक असतील.

बारा पदे मंजूर

चाकण एमआयडीसी उपविभाग कार्यालयासाठी उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद अशी १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या वासूली व निघोजे शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ असे प्रत्येकी १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT