Electricity Issue : बदलत्या वीज वेळापत्रकाने रोष

Mahavitaran Update : रब्बी हंगामात सिंचनासाठी पुरविल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकामुळे शेतकरी चांगलाच संतापला आहे.
Mahavitaran
Mahavitaran Agrowon

Amravati News : रब्बी हंगामात सिंचनासाठी पुरविल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकामुळे शेतकरी चांगलाच संतापला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेल्या पुरवठ्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने व रात्री १० नंतर पुरवठा करण्यात येत असल्याने त्यांचा महावितरणवर रोष आहे.

सध्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा व रात्री, असे दोन पाळ्यांमध्ये आठतास वीजपुरवठा केला जातो. आठवड्यातून तीन दिवसच दिवसा व चार दिवस रात्री पुरवठा करण्यात येत आहे. वेळापत्रकात बदल करीत पुरवठा करण्यात येतो. रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रब्बी हंगामात सिंचनाची खरी वेळ डिसेंबर ते फेब्रुवारी आहे.

Mahavitaran
Electricity Bills : १५ दिवसांत वीज बिले भरा अन्यथा विद्यूत प्रवाह खंडीत, महावितरणचा शेतकऱ्यांवर दबाव

या कालावधीत चण्याचे पीक निघत असले तरी जानेवारी ते मार्च हा काळ गव्हाच्या सिंचनासाठी आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला जात असून ज्यांना पहिल्या कालावधीत दिवसा पुरवठा झाला त्यांना नंतर रात्री केला जातो. सिंचनाच्या कालावधीत थंडी राहत असून ओलितामुळे त्यामध्ये आणखी भर पडते.

अशा वेळी अपघाताची शक्यता अधिक राहत असून ते घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे हंगामाभर दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्ह्यात एक लाख ३५ हजारांच्या जवळपास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत असून यातील बहुतांश पंपांना रात्रीच्या वेळीच पुरवठा मिळतो. त्यातही अनेकदा तो खंडित व कमी दाबाचा राहत असल्याने सिंचनाला अधिक वेळ लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून दिवसा सलग पुरवठा करण्याची त्यांची मागणी आहे.

Mahavitaran
Electricity Bill : चार लाख ग्राहकांकडे १९२ कोटींवर वीजबिल थकीत

२०२६ मध्ये मिळणार दिवसा वीज

राज्य सरकारने मुख्यमंत्री सैार कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या योजनेची निविदा प्रक्रियाही पूर्ण केली असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास अठरा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या वर्षी एप्रिलमध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास २०२६ च्या रब्बी हंगामात दिवसा वीजपुरवठा शक्य होणार आहे. अद्याप या प्रकल्पास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मंजुरी मिळायची आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आठ हजार मेगावॅट वीज निर्माण होणार आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवसा बारातास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. या हंगामात ते पूर्ण झालेले नाही. आता वेळापत्रक पुन्हा बदलले आहे. रात्री आठतास वीज मिळते, तीही खंडित स्वरूपाने. त्यामुळे सिंचन पूर्ण होत नाही, शिवाय वेळ वाया जातो. ज्या घोषणा केल्या तर त्या पूर्ण करा.
अनिल कदम, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com