Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : ‘वसंतदादा’ कारखाना ताब्यात घेण्याचा जिल्हा बॅंकेचा इशारा

Cooperative Sugar Mill : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्जापोटी मागील तीन वर्षांत ‘दत्त इंडिया’ने जिल्हा बॅँकेकडे पैसे भरले नाहीत.

Team Agrowon

Sangli News : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्जापोटी मागील तीन वर्षांत ‘दत्त इंडिया’ने जिल्हा बॅँकेकडे पैसे भरले नाहीत. कारखान्याचे सुमारे ४५ कोटी रुपये थकित आहेत.

त्यामुळे ‘जिल्हा बॅँक, वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया यांच्यात झालेला त्रिपक्षीय करार मोडून कारखाना ताब्यात का घेण्यात येऊ नये,’ अशी नोटीस जिल्हा बँकेने ‘दत्त इंडिया’ला बजावली आहे.

१५ दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. दरम्यान, यासंदर्भात ‘दत्त इंडिया’चे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

‘वसंतदादा’कडील थकित कर्जाच्या वसुलीसाठी बॅँकेने कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता ‘सिक्युरिटायझेशन ॲक्ट’अंतर्गत ताब्यात घेतली. कारखाना चालवण्यास देण्यासाठी जिल्हा बॅँकेने निविदा मागवल्या.

‘दत्त इंडिया’ला दहा वर्षांच्या मुदतीने कारखाना चालवण्यास दिला आहे. आठ वर्षे कारखाना ‘दत्त इंडिया’ चालवत आहे.

दत्त इंडिया’ने आतापर्यंत ‘वसंतदादा’चे जिल्हा बॅँकेकडील थकित ५० टक्क्यांहून अधिक कर्ज भरले आहे. तीन वर्षांपासून कंपनीने कर्जापोटी पैसे भरले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT