Akola News : अकोला ः जिल्ह्यातील चेलका या छोट्याशा गावाने आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातून दुष्काळाविरुद्ध लढाई जिंकली. आता शेती समृद्ध करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गटांनी जोर लावलेला आहे.
सामूहिक शेती करीत आहेत. गावाच्या कामगिरीची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी भेट देऊन आढावा घेतला. यानिमित्ताने चेलका येथे शिवारफेरी काढण्यात आली. यामध्ये उन्हाळी पिकांची पाहणी करण्यात आली. तीळ, भुईमूग, मका, मूग, कांदा या पिकांची पाहणी केली. गोकृपा अमृत, अमृत जल, गांडूळ खत, मधुमक्षिका पालनाबाबतही त्यांनी माहिती घेतली. या वेळी गटातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांसाठी एसओपीची अंमलबजावणी केल्यामुळे पिके हिरवेगार व रोगमुक्त असून सुदृढ आहेत.
तसेच या वर्षी पिकाची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. भुईमूग व मुगाच्या पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावल्याने रसशोषण करणाऱ्या किडी या चिकट सापळ्याला चिकटलेल्या मोठ्या प्रमाणात दिसल्या.
गावातील शेतकरी रामेश्वर उंडाळ, विजय उंडाळ, चंद्रशेखर उंडाळ, अरुण उंडाळ, नितीन परांडे, निखिल उडाळ, जय उंडाळ, हर्षद उंडाळ आदी शेतकरी गटशेतीसाठी पुढाकार घेत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चेलका गाव दत्तक घेतले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विस्तार विद्यावेत्ता डॉ. प्रकाश घाटोळ तसेच विद्यापीठाचे अधिकारी या गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.