Market Bulletin:सोयाबीन दरात वाढदेशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. तर सोयाबीनला उठाव चांगला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली. आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ६ हजार ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान वाढवले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनला उठाव असल्याने सोयाबीनचा भाव काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस टिकून देशातील बाजारात आज कापसाचा भाव टिकून होता. कापसाला उठाव असल्याने वाढलेले दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार २०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सध्या बाजारातील कापसाची आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे कापसाला उठाव चांगला आहे. त्यामुळे कपासाचे भाव वाढले आहेत. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते. त्यामुळे कापसाचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: मका भावावर आवकेचा दबाव; कापसात सुधारणा, सोयाबीन टिकून, भेंडीला मागणी तर हरभरा आवकेचा दबाव.मका आवक स्थिरावलीदेशातील बाजारात मक्याचा भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. यंदा मक्याचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. मक्याच्या भावाने आतापर्यंत महीभावाचा टप्पा पार केलेला नाही किंवा हमीभावाच्या जवळही भाव पोचले नाहीत. देशातील उत्पादन वाढले आणि मागणी मात्र स्थिर राहीली. यामुळे मक्याच्या भावावर दबाव आहे. सध्या बाजारात मका १६०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. यामुळे भाव या पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कांद्याला भाव कमीच; कापसाला मागणी, सोयाबीन टिकून, जिरा भाव नरमला तर खरबुजाची आवक वाढली.आवळ्याला मागणीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आवळ्याची आवक कमी झाली आहे. तर आवळ्याला मागणी चांगली आहे. यामुळे आवळ्याचा भाव टिकून आहेत. आवळ्याला बाजारात सध्या प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आवळ्याची बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवळ्याच्या दरातही सुधारणा अपेक्षित असल्याचे व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. .ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.