Beekeeping
Beekeeping Agrowon

Beekeeping : ‘मॉडेल व्‍हिलेज’ चेलका गावात मधुमक्षिका पालन

Beekeeping Business : या गावातील शेतकरी आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल त्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. म्हणून गावातील १० शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन करण्याचा निर्णय घेतला.
Published on

Akola News : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मॉडेल व्हिलेज चेलका येथे १० शेतकऱ्यांना मधुमक्षिका पेट्यांचे वाटप करण्यात आले.

या गावातील शेतकरी आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल त्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. म्हणून गावातील १० शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विद्यापीठाचे विस्तार विद्यावेत्ता डॉ.प्रकाश घाटोळ यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले.

श्री. घाटोळ यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चेलका येथे १० शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी पेट्यांची विचारणा केली. या एका पेटीची किंमत अंदाजे साडेसहा हजार आहे. सर्व शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नव्हता.

Beekeeping
Beekeeping : मधमाशीपालनासाठी प्रजातींची निवड

दरम्यान सप्टेंबर महिन्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित शिवार फेरीदरम्यान चेलका गावातील ४० पुरुष व महिला शेतकरी सहभागी झाले होते. या सर्व शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट दिली असता तेथे प्रभारी अधिकारी डॉ.प्रकाश घाटोळ व आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांच्या सोबत भेट घेतली.

त्यावेळी शेतकऱ्यांनी डॉ. इंगळे यांना विनंती करून मधुमक्षिका पालन करण्यासाठी आत्मा विभागामार्फत काही मदत करता येईल का अशी विचारणा केली. डॉ. इंगळे यांनी १०० टक्के अनुदानावर १० शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन करण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिला.

त्यानुसार चेलका येथील १० शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाचे जिल्हा अधिकारी एस. पी. वानखडे आणि निरीक्षक आर. एम. बिलबिले यांनी मधुमक्षिका पेट्यांचे वाटप केले. यावेळी अधिकाऱ्यांसह रामेश्वर पाटील, नितीन परांडे, बाबाराव पाटील, महादेव अरबाड, अरुण उंडाळ, राजू पाटील, ज्ञानेश पाटील, विजय उंडाळ, संदीप उंडाळ व इतर शेतकरी उपस्थित होते.

Beekeeping
Beekeeping : मधमाशीपालनातून मिळणारी आरोग्यदायी उत्पादने

असे आहे चेलका...

विद्यापीठाचे मॉडेल व्हिलेज

विद्यापीठाचे तंत्रज्ञान, पीकवाणाचा वापर

शेतीपूरक व्यवसायावरही जोर

शेतीचे उत्पादन व उत्पन्न वाढीचे प्रयत्न

बागायती पिकांसह हंगामी पिकांवर जोर

आता मधुमक्षिका पालनाला सुरवात

कृषी तंत्रज्ञान यंत्रणे (आत्मा)च्या पुढाकाराने जिल्हयात ७० जणांना मधुमक्षिका पालनासाठी प्रात्यक्षिकात पेट्या देण्यात आल्या आहेत. मधमाशाकडून नैसर्गिक पद्धतीने परपरागीभवनाची प्रक्रीया पार पाडली जाते. यामुळे उत्पादन वाढीला मदत होते. शिवाय शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचा फायदा होतो. हे फायदे लक्षात घेत यंदा १०० टक्के अनुदानावर आपण जिल्हयात ७० प्रात्यक्षिके दिली आहेत.
-डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक, आत्मा, अकोला.
विद्यापीठाचे मॉडेल व्हिलेज असलेल्या चेलका येथे आता मधुमक्षिका पालनातूनही उत्पादन वाढले. शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही हा एक व्यवसाय सुरु केला आहे.
- रामेश्वर पाटील, शेतकरी, मॉडेल व्हिलेज चेलका, ता. बार्शीटाकळी, जि अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com