MAIDC Agrowon
ॲग्रो विशेष

Spray Pump : फवारणी पंपांचे वितरण थांबवले?

MAIDC : कापूस आणि सोयाबीन मूल्यसाखळी विकासांतर्गत देण्यात येणाऱ्या फवारणी पंपांचे वितरण थांबविण्यात आले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : कापूस आणि सोयाबीन मूल्यसाखळी विकासांतर्गत देण्यात येणाऱ्या फवारणी पंपांचे वितरण थांबविण्यात आले आहे. पंपांच्या दरातील तफावतीचा मुद्दा निकाली निघाल्यानंतरच पंप वितरित करावेत, असे तोंडी आदेश सचिव व्ही. राधा यांनी कृषी उद्योग महामंडळाला दिले आहेत.

यासंदर्भात ‘ॲग्रोवन’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याचा संदर्भही सचिव पातळीवर घेण्यात आला आहे. कापूस, सोयाबीन आणि तेलबियांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळीच्या विकासासाठी विशेष कृती योजनेसाठी कृषी विभागाने फवारणी पंप, नॅनो युरिया, डीएपी, कॉटन बॅग आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावावरील कीटकनाशकांच्या वितरणाचा निर्णय घेतला होता.

यासाठी ३४२ कोटी रुपये खर्चास मान्यता दिली होती. कृषी उद्योग महामंडळाने पंप निर्मिती करताना अवलंबण्यात आलेली करार पद्धती आणि अन्य कंपन्यांच्या पंपांचे दर आदींचा तुलनात्मक अहवालही सचिव पातळीवर तयार केला आहे. महामंडळाने पंप निर्मितीसाठी करार पद्धतीने देण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबविली, असा आक्षेपही घेण्यात आला आहे.

विशेष कृती कार्यक्रमासाठी शासन आदेश आचारसंहिता लागण्याआधी एक दिवस आधी काढण्यात आला होता. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या योजनेंतर्गत १ लाख ६७ हजार फवारणी पंप वितरित करण्यात येणार होते. त्यासाठी कृषी उद्योग महामंडळाने करार पद्धतीने पंप तयार करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या.

महामंडळ फवारणी पंप तयार करणार होते. ही संपूर्ण निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर प्रत्यक्ष फवारणी पंप वितरणाच्या उबंरठ्यावर असताना दरातील तफावतीवरून एका कंत्राटदाराने तक्रार केली होती. त्यामुळे नव्याने आलेल्या सचिव व्ही राधा यांनी या प्रकरणाचा अभ्यास करून दरातील तफावतीचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

तक्रारदाराने थेट सचिव पातळीवर तक्रार केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले. दरासंदर्भात आयुक्त कार्यालय आणि कृषी उद्योग महामंडळाकडून खुलासाही मागविण्यात आल्याचे समजते. मात्र हा खुलासाही मान्य करण्यात आलेला नाही.

त्यामुळे दरातील तफावतीचा मुद्दा निकाली निघत नाही, तोवर पंपांचे वितरण करू नये, असे तोंडी आदेश सचिव व्ही. राधा यांनी दिले. कृषी उद्योग महामंडळाकडील पंपांची मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. मात्र, सचिवांनी आदेश दिल्यामुळे पंप वितरण थांबले आहे.

वादात रखडली योजना

भरमसाट खर्च करून राबविण्यात आलेली योजना मंत्री कार्यालय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वादात रखडली आहे. सध्या पाऊसकाळ असून काही ठिकाणी खत, कीटकनाशक फवारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे या योजनेतील पंप मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पंप, नॅनो युरिया, शंखी गोगलगायीवर प्रभावी असलेल्या कीटकनाशक वितरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT