MAIDC Land : ‘कृषिउद्योग’च्या भूखंडावर आता खासगी कंपन्या

Land On Lease : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाच्या (एमएआयडीसी) जागा आता खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत.
MAIDC
MAIDCAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाच्या (एमएआयडीसी) जागा आता खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत. या जागांवर कंपन्यांकडून उत्पादने तयार करून घेत त्यावर महामंडळाचा शिक्का मारुन ती शेतकऱ्यांना विकण्याचे नवे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

दर्जेदार निविष्ठा व गुणवत्तापूर्ण आधुनिक अवजारे स्वतः राज्यातील शेतकऱ्यांना विकावीत, अशी मूळ जबाबदारी महामंडळावर होती. त्याचबरोबर चांगल्या कंपन्यांसोबत करार करून खासगी उत्पादनेदेखील महामंडळामार्फत शेतकऱ्यांपर्यंत जावी व त्यातून महामंडळाने नफा कमवावा, असेही उद्दिष्ट महामंडळाचे होते. दुर्दैवाने या दोन्हीही उद्दिष्टांपासून महामंडळ भरकटले. महामंडळाची अनेक उत्पादने बंद पडली.

MAIDC
MAIDC : ‘कृषी उद्योग विकास’मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्याला त्रास

नवी उत्पादने मोठ्या प्रमाणात तयार झाली नाहीत. तसेच खासगी कंपन्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या विक्री पुरवठ्याचे जाळेही महामंडळाला उभारता आले नाही. गैरव्यवहार, चौकशा, वसुलीची प्रकरणे थेट विधिमंडळापर्यंत गेल्याने आता महामंडळाची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पुण्याच्या चिंचवड भागात ‘कृषिउद्योग’ची कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा आहे. पुरेसे मनुष्यबळ, संशोधन व विकास प्रणालीचा अभाव यामुळे कार्यशाळेची कोट्यवधी रुपयांची मोकळी जागा पडून आहे. ही जागा आता खासगी कंपन्यांना किंवा उत्पादकांना भाडेतत्वावर दिली जाईल. या कंपन्या विविध उत्पादने तयार करतील व त्यावर महामंडळाची ‘कृषी उद्योग’ अशी नाममुद्रा टाकली जाईल.

भाडेतत्वावर जागा वाटण्यासाठी ई-निविदादेखील काढण्यात आलेल्या आहेत. भाडेतत्वावर भूखंड वापरले गेल्यास महामंडळाला भाडेपट्टा मिळेलच; पण नवी उत्पादने मिळून उत्पन्नातही वाढ होईल, असा दावा ‘कृषिउद्योग’ करते आहे.

भाडेतत्वावरील जागांमधून पहिल्या टप्प्यात किमान १७ कृषी अवजारे तयार व्हावीत, असा प्रयत्न ‘कृषिउद्योग’चा आहे. यात दोन प्रकारचे हातचलित फवारणी पंप, चार प्रकारचे बॅटरीचलित फवारणी पंप व तीन प्रकारच्या बॅटरीसह हातचलित अशी सुविधा असलेल्या फवारणी पंपांचा समावेश आहे.

MAIDC
MAIDC : ‘कृषिउद्योग’मधील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्याही बदल्या

कंपन्यांच्या उत्पादनावर ‘कृषिउद्योग’ची नाममुद्रा

दरम्यान, कृषी खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य व परराज्यातील काही कंत्राटदार कृषी अवजारांच्या बाजारांमध्ये गुणवत्ताहिन उत्पादने विकत धुमाकूळ घालत आहेत. हेच कंत्राटदार भविष्यात महामंडळाच्या भूखंडावर स्वतःचे कारखाने थाटू शकतात.

त्यामुळे महामंडळाच्या जागेवरील कारखान्यात तयार झालेले उत्पादन ‘कृषी उद्योग’ नावाचे लेबल लावत बाजारात विकले गेल्यास व त्यातून गुणवत्तेच्या तक्रारी आल्यास शेतकरी नाराज होऊ शकतात. त्यामुळेच महामंडळाला या प्रकरणात खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सात कंत्राटदारांच्या निविदा पात्र

कृषिउद्योग महामंडळाकडून स्वतःच्या ब्रॅंडने अवजारे तयार करून घेण्यासाठी मागविलेल्या निविदांमध्ये सात कंत्राटदार पात्र ठरले आहेत. यात फवारणी पंपातील पाच तर सीड ट्रीटमेंट ड्रम निर्मितीमधील दोन कंत्राटदारांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com