Farmer Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Empowerment: सोयाबीन बॅग, द्रवरूप खतांचे शेतकऱ्यांना वाटप

FPO Initiative: मालेगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकरी मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून परिसरातील ६५ सभासद शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानित योजनेतील सोयाबीन बियाणे बॅग व द्रवरूप जिवाणू खतांचे वाटप करण्यात आले.

Team Agrowon

Nanded News: मालेगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकरी मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून परिसरातील ६५ सभासद शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानित योजनेतील सोयाबीन बियाणे बॅग व द्रवरूप जिवाणू खतांचे वाटप करण्यात आले.

या वेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर, शासकीय कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेश जायेवार, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी विशाल बिऱ्हाडे, ब्रह्माकुमार दत्ताभाई कदम, ब्रह्माकुमारी स्वाती बहेनजी, अनिता बहनजी,

‘के फर्ट लॅब’चे भानुदास पेंडकर, एकनाथ पाटील, वसमत हळद संशोधन केंद्राचे प्रमुख रमेश देशमुख, कंपनीचे संचालक प्रल्हाद इंगोले, कृषिभूषण भगवान इंगोले आदी उपस्थित होते. पेरणीपूर्व नैसर्गिक शेती मार्गदर्शन मेळावा व अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्याचे वाटप कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी व शेतकरी मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनी मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव येथे करण्यात आले.

कंपनीच्या महिला, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गरजू सभासद शेतकऱ्यांसह ६५ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे बॅग व द्रवरूप जिवाणू खत देण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पेरणीपूर्व मशागत बीजप्रक्रिया व अन्य बाबींची माहिती शेतकऱ्यांना दिली.

कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून भविष्यात शेतीमालाचे मूल्यसाखळी उभी करून शेतीमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी प्रयत्न राहील, असे प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Import: आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कडधान्यांच्या आयातीत घट, कारणे काय?

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले, कापूस दरात नरमाई, हरभरा स्थिरावला, मका दबावात, लसणाला उठाव

Government Hostel Scheme: ‘स्वयंम’ आणि ज्ञानज्योती योजनेसाठी वेळापत्रक निश्चित

MSP Issue: हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्यांचे परवाने नूतनीकरण स्थगित करा

Farmers Demand: कृषी महोत्सव वर्षातून दोन वेळा व्हावा

SCROLL FOR NEXT