Farmer Empowerment : शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे प्रयत्न

Kharif Season : आगामी खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन केले आहे.
Girish Mahajan
Girish MahajanAgrowon
Published on
Updated on

Nashik News : आगामी खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन केले आहे.त्यासाठी आवश्यक बि-बियाणे, रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, अशी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी म्हणून नोंदणी करून घ्यावी.

यासह कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन समारंभ पोलिस संचलन मैदानावर गुरुवारी (ता. १) रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

Girish Mahajan
Economic Empowerment: शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस दल, गृह रक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, शहर पोलिस वाहतूक शाखेच्या तुकडीने संचलन करून मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून १५ हजार १४५ सभासदांना १४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ करिता सर्वसाधारण योजनेसाठी ९०० कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी ४४३ कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०१ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे.

Girish Mahajan
Women Empowerment: प्रक्रिया उद्योगाने दिली आर्थिक साथ...

प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार २२२ योजनांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये एक हजार २९६ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत ६ लाख ७० हजार ९३६ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.

बळीराजा सेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २ कोटी

पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि तक्रारींची तत्काळ दखल घेता यावी म्हणून बळीराजा सेल कार्यान्वित केला आहे. आतापर्यंत ९५८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिस दलाने या शेतकऱ्यांना २ कोटी ३३ लाख ४२ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com