Farmer E-KYC  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture E-KYC : ‘केवायसी’ अभावी १९ लाख शेतकऱ्यांची मदतवाटप थांबली

Team Agrowon

Pune News : राज्यात गेल्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीनचे पीक घेणाऱ्या १९ लाख शेतकऱ्यांची केवळ ‘केवायसी’ झाली नसल्याने मदत मिळालेली नाही. २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीकपाहणी झालेल्या नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये मदत दिली जात आहे.

तसेच ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार कमाल दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जात आहे. मात्र मदत मिळण्यासाठी ‘केवायसी’ (नो यूवर कस्टमर) अर्थात, ‘पात्र लाभार्थी असल्याची पडताळणी’ पूर्ण करण्याची अट आहे.

त्यासाठी संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ (Namo Shetkari Mahasanman Nidhi) योजनेची मदत मिळत असलेल्या शेतकऱ्यांना केवायसीतून वगळण्यात आले आहे.

सातबारा उताऱ्यावर कापूस, सोयाबीनची नोंद असणारे तसेच वनपट्टाधारक शेतकरी याशिवाय भूमी अभिलेख संगणकीकरण न झालेल्या गावातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरीदेखील मदतीस पात्र आहेत. परंतु त्यांनाही ई-केवायसी (E-KYC) बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बॅंक खात्यात थेट मदत जमा केली जात आहे. त्याकरिता शेतकऱ्याने आधार संमती द्यावी, अशी दुसरी अट आहे. राज्यात सध्या ९६ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार संमती दिली आहे. त्यानंतर पुढचा टप्पा येतो तो ई-केवायसीचा आहे.

कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार, ६८ लाख शेतकऱ्यांपैकी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत समावेश असलेल्या ४६.६८ लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक जुळले आहेत. त्यामुळे त्यांची केवायसी झालेली आहे. परंतु उर्वरित, २१.३८ लाख शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही. कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत २.३० लाख शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे.

परंतु अद्यापही १९ लाख शेतकऱ्यांना केवायसीच्या (KYC) प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी https://scagridbt.mahait.org/ संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या गावोगावी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

...अशी करा ई-केवायसी

पहिली पद्धत :

गावच्या कृषी सहायकाशी त्वरित संपर्क करावा. > आधार संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक कृषी सहायकाला द्यावा. > भ्रमणध्वनीवर आलेला संकेतांक (ओटीपी कोड) कृषी सहायकाला द्यावा.

किंवा दुसरी पद्धत

https://scagridbt.mahait.org/ संकेतस्थळ उघडावे. > तेथे मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस येथे क्लिक करावे. > शेतकऱ्याने आधार क्रमांक टाकावा. > ओटीपी किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून केवायसी पूर्ण करावी. हिच सेवा सार्वजनिक सुविधा केंद्राच्या (सीएससी) मदतीने देखील करता येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rajaram Sugar Factory : राजाराम साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ, सभागृहात प्रवेश नाकारल्याने सत्ताधाऱ्यांचा निषेध

Rice Export : केंद्राने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली, अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील १० टक्क्यांवर आणले

Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

Soybean Disease : सोयाबीन पिकातील ‘टार्गेट स्पॉट रोग’

World Rabies Day : रेबीज नियंत्रणासाठी सर्वसमावेशक उपायांची गरज

SCROLL FOR NEXT