Cotton Soybean Madat : ई-केवायसी केली तरचं मिळणार कापूस सोयाबीन अनुदान; २१ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी

Agriculture E-KYC : कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. अनुदानासाठी पात्र ९६ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. मात्र २१ लाघ ३८ हजार शेतकरी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही.
Agriculture E-KYC
Agriculture E-KYCAgrowon
Published on
Updated on

Pune News : कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. अनुदानासाठी पात्र ९६ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. मात्र २१ लाघ ३८ हजार शेतकरी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांची ई-केवासी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. ई-केवायसी केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करावी. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे. या अर्थसाहाय्यासाठी ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य मिळणार आहे. या अर्थसहाय्यात ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे. तसेच वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही. अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

Agriculture E-KYC
Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदान वाटपाची नवीन तारीख २९ सप्टेंबर; 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरूच

पण अर्थसाहाय्यासाठी ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनी आधार संलग्न करणे गरजेचे आहे. आधार संलग्न केल्यानंतरच बँक खात्यावर शासनाकडून ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे . या पैकी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

Agriculture E-KYC
E-KYC : ‘सर्व्हर डाउन’मुळे ई-केवायसी रखडली

मात्र या व्यतिरिक्त राहिलेले २१.३८ लाख शेतकऱ्यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी २.३० लाख शेतकऱ्यांनी दिनांक २५.९.२०२४ अखेर ई-केवायसी पूर्ण केले आहे . तर उर्वरित १९ लाख शेतकऱ्यांसाठी विभागाने https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

कशी करावी ई-केवायसी

ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषी सहाय्यक त्यांच्या लॅागइनमधून उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून E-KYC करता येते.

तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC)जावून सुद्धा E-KYC करु शकतात.

शेतकऱ्यांनी https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जावे.

या पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement Status येथे click करावे.

शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा.

नंतर मोबाईलवर प्राप्त OTP वापरुन किंवा सेवा सुविधा केंद्रातील (CSC) बायोमेट्रिक मशिनच्या माध्यमातून ते ई-केवायसी पूर्ण करु शकतात.

यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पुर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा.
- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com