Malegaon Market Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Market: मालेगाव बाजार समितीत सभापती-व्यापाऱ्यांमध्ये वाद

Market News: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती चंद्रकांत शेवाळे आणि फळ व भाजीपाला व्यापाऱ्यांमध्ये बैठकीत वाद झाला. सभापती शेवाळे यांनी दमबाजी करत शिवीगाळ केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

Team Agrowon

Nashik News: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती चंद्रकांत शेवाळे आणि फळ व भाजीपाला व्यापाऱ्यांमध्ये बैठकीत वाद झाला. सभापती शेवाळे यांनी दमबाजी करत शिवीगाळ केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सभापतींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सभापतींनी पदाचा राजीनामा द्यावा.

तसेच ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय फळ व भाजीपाला असोसिएशनने घेतल्याची माहिती अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी दिली. दरम्यान, सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.बाजार समितीत सोमवारी (ता. ३०) सभापती शेवाळे यांनी फळ व भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती.

असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सोनवणे, नथू वाघ, दिलीप अभोणकर, देवीदास वाघ, फकिरा हाजी, निहालभाई यांच्यासह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. बैठकीत सभापतींनी येणाऱ्या मालाची नोंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना बाजार समितीचे बुक द्यायचे आहे,असे सांगितले. यावर काही व्यापाऱ्यांनी असा कायदा नसल्याचे सांगितल्याने वादाची ठिणगी पडली.

काही वेळानंतर व्यापारी बैठकीतून निघून गेले. या संदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष सोनवणे यांनी पत्रकारांना माहिती दिली. सभापतींनी चिडून व्यापाऱ्यांना शिवीगाळ केली. धमकी, दमबाजी करत अर्वाच्य भाषा वापरली. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी मंगळवार (ता. १) पासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापाऱ्यांनी केलेले आरोप पूर्णता खोटे आहेत. मी शिवीगाळ केलेली नाही. व्यापारी किती माल विकतात हे समजत नाही. नियमानुसार व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे पुस्तक वापरावे, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. त्यांनी विषयांतर केले. व्यापारी बाजार बंद ठेवणार असल्याची समितीला माहिती नाही, असे केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. प्राप्तिकर विभागाला पत्र देऊन व्यापाऱ्यांच्या खात्यावरील व्यवहार तपासले जातील. झालेल्या व्यवहारानुसार बाजार फी न भरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल.
- चंद्रकांत शेवाळे, सभापती, कृउबा, मालेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT