Pesticide Agrowon
ॲग्रो विशेष

Disposal of Pesticides : मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीचा अद्याप तिढा

Team Agrowon

Wardha News : कृषी केंद्रात असलेल्या मुदतबाह्य कीटकनाशकांची विल्हेवाट लावण्याचे अधिकार कृषी केंद्रचालकांना नाही. पर्यावरणाकरिता धोकादायक या कीटकनाशकांची विल्हेवाट किंवा त्यांचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी कंपन्यांनी घ्यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. याकडे मात्र कंपन्यांनी काणाडोळा केल्याने मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीचा तिढा कायम आहे.

मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्या, याकरिता कृषी केंद्र संचालकांच्या शिष्टमंडळाचा लढा कायम आहे. त्यांच्याकडून कृषी आयुक्तालयांपर्यंत पायऱ्या झिजविण्यात आल्या. याउपरही त्यावर थेट असा कुठलाही मार्ग काढण्यात आला नाही. प्रत्येक हंगामात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य कीटकनाशके कृषी केंद्र चालकाकडे शिल्लक असते. त्याची थेट विल्हेवाट लावण्याकरिता कृषी केंद्रचालकांकडून अनेक युक्त्या राबविण्यात येतात.

कृषी केंद्रात असलेल्या मुदतबाह्य कीटकनाशकांची विल्हेवाट लावताना पर्यावरणास धोका निर्माण होणार नाही, याची दखल घेत विल्हेवाट लावण्याकरिता ‘इव्हॅक्युएटर’ अशा यंत्राची गरज आहे. ती यंत्रणा मोठ्या कंपन्यांकडे असल्याने त्यांनी याची जबाबदारी घ्यावी, अशा सूचना शासनाच्या आहेत. अशा सूचना असताना कीटकनाशकांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून या निर्देशांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. यामुळे यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी कृषी केंद्र चालकांकडून करण्यात आली आहे.

विल्हेवाटीकरिता अनेक अघोरी उपाय

कृषी केंद्रात शिल्लक असलेल्या मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीकरिता कृषी केंद्रचालकांकडून अनेक युक्त्या राबविण्यात येतात. यात घरी शेती असलेल्या कृषी केंद्रचालकांकडून स्वतःच्या शेतात त्याचा वापर केला जातो. असे करताना त्यांच्याकडे काम करणाऱ्या शेतमजुराचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला किंवा ओळखीच्या शेतकऱ्याला हे कीटकनाशक विकले जाते. सध्या अशा अनेक अघोरी उपायांतून मुदतबाह्य कीटकनाशकांची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीकरिता अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता कृषिमंत्र्यांसह आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. पण, त्याचा लाभ झाला नाही. कंपन्यांना वारंवार मागणी केली, त्याचाही लाभ झाला नाही. याकरिता अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे.
रवी शेंडे, अध्यक्ष, कृषी व्यवसायी संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

Congress questions on Modi's visit : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले, भाजपने काय केलं? काँग्रेसचा मोदींना सवाल

Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

SCROLL FOR NEXT