Turmeric Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Management : हळद शेतीदिनाच्या कार्यक्रमात पीक व्यवस्थापनावर चर्चा

Turmeric Crop : केव्हिकेच्या उद्यानविद्याशाखांतर्गत हळद पिकात उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

Team Agrowon

Washim News : केव्हिकेच्या उद्यानविद्याशाखांतर्गत हळद पिकात उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. रिसोड तालुक्यातील मौजे कोयाळी बुद्रुक येथे गणेश गव्हाणे यांच्या शेतात राबवलेल्या हळद पीक प्रात्यक्षिक क्षेत्रावर शेतीदिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे होते. तांत्रिक मार्गदर्शक म्हणून उद्यान विद्यातज्ञ निवृत्ती पाटील, कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. डी. एन. इंगोले आणि प्रमुख पाहुणे म्हणून वाशीम जिल्ह्यातील प्रगतिशील हळद उत्पादक शेतकरी गजानन ढवळे, रामचंद्र इंगोले, गोविंद देशमुख, योगेश खानझोडे यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम प्रात्यक्षिक प्लॉटची तसेच त्याच शेतातील पारंपरिक प्लॉटची पाहणी करून निरीक्षणे घेण्यात आली. गणेश गव्हाणे यांनी केव्हीकेद्वारे राबवलेल्या प्रात्यक्षिक प्लॉटबद्दल माहिती दिली. यामध्ये गट्टू बेण्याचा वापर, कमी कालावधीत येणारी पीडीकेव्ही वायगाव वाण, गोकृपा अमृताचा वापर अशा विविध पद्धतीद्वारे विकसित केलेल्या प्लॉटमध्ये राबविलेल्या संपूर्ण तंत्राबद्दल माहिती दिली.

निवृत्ती पाटील यांनी दोन्ही प्लॉटमधील महत्त्वाच्या तफावतीमध्ये जसे पिकाची वाढ, फुटव्यांची संख्या, आकार आदी विविध फरक दाखवून दिले. तांत्रिक सत्रात योगेश खानझोडे यांच्या शेतात मागील दोन वर्षांपासून राबवितात राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकाबद्दल व मिळालेल्या फायद्यांबद्दल संपूर्ण माहिती दिल्या गेली.

गोविंद देशमुख यांनी सुद्धा मागील चार वर्षांपासून राबवित असलेल्या प्रात्यक्षिक व फायद्यांबद्दल सांगितले. प्रयोगशिल शेतकरी गजानन ढवळे यांनी प्रात्यक्षिक व पारंपरिक प्लॉटमधील दिसलेल्या फरकाबाबत माहिती दिली व आलेले परिणाम खरोखर उत्कृष्ट असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT