Turmeric and Chana Rate : हळद व हरभऱ्याच्या भावात नरमाई

Market Rate : ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे कापूस, मका, मूग, सोयाबीन व कांदा यांच्या आवकेचे मुख्य महिने. उत्पादनाचे अंदाज येण्यास उशीर लागतो. मात्र आवकेवरून त्याचा अंदाज करता येतो.
Turmeric And Chana
Turmeric And ChanaAgrowon
Published on
Updated on

Market Rate : फ्यूचर्स किमती : सप्ताह ३० डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४

ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे कापूस, मका, मूग, सोयाबीन व कांदा यांच्या आवकेचे मुख्य महिने. उत्पादनाचे अंदाज येण्यास उशीर लागतो. मात्र आवकेवरून त्याचा अंदाज करता येतो.

गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू वर्षी (२०२३) या तीन महिन्यांत देशातील सर्व बाजार समित्यांमधील कापसाची आवक जवळ जवळ ३० टक्क्यांनी वाढली; किमती याच कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेने १६.७ टक्क्यांनी उतरल्या. मक्याची आवक ७.७ टक्क्यांनी वाढली, किंमत ३.६ टक्क्यांनी उतरली. मुगाची आवक ६.७ टक्क्यांनी वाढली व किंमतसुद्धा २२ टक्क्यांनी वाढली.

सोयाबीनची आवक १.७ टक्क्याने वाढली; किंमत ८.७ टक्क्यांनी उतरली. खरीप कांद्याची आवक या वर्षी १३.४ टक्क्यांनी कमी झाली; त्याचा परिणाम म्हणून किमती ७८.४ टक्क्यांनी वाढल्या. टोमॅटोची आवक सुद्धा १.५ टक्क्याने कमी झाली व किमती ८.२ टक्क्यांनी वाढल्या. आवक व किंमत यातील सहसंबंध बहुतांशी विषम असतो व तो प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळा असतो. नाशिवंत वस्तूंसाठी तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचा प्रत्यय गेल्या तीन महिन्यांत आला.

१ जानेवारीपासून NCDEX मध्ये मक्याचे मे डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू झाले. MCX मध्ये सध्या कापसाचे मार्च डिलिव्हरीसाठी व कपाशीचे फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत. NCDEX मध्ये मक्याचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिव्हरीसाठी तर हळदीचे एप्रिल व जून डिलिव्हरीसाठी फ्यूचर्स व्यवहार सुरू आहेत.

या सप्ताहात हळद व हरभऱ्याचे भाव उतरले. कांदा व टोमॅटो यांचे भाव वाढले. ५ जानेवारी २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

Turmeric And Chana
Turmeric Rate : ऐन सणासुदीत हळदीच्या बाजारावर दबाव; भाव काय राहतील?

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात ते रु. ५५,२८० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव रु. ५८,०८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात रु. १,३९७ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६० वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ११.६ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,१५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (फेब्रुवारी) किमती रु. २,१७० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. २,१९५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.७ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

Turmeric And Chana
Chana Rate: वाटाणा आयात निर्णयाचा परिणाम हरभऱ्यावर

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती रु. १३,०६१ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १३,४३४ वर आल्या आहेत. जून किमती रु. १३,५०४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ३.४ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात रु. ५,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात रु. ४,८९९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात रु. ८,३७५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० जाहीर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत होत्या; मात्र त्या सध्या कमी होत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,५०० होती; या सप्ताहात येथील किंमत रु. १,७०७ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,६६७ वर आली होती. या सप्ताहात ती रु. २,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com