Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयना धरणातून विसर्ग पाचशे क्युसेकने कमी

Koyna Dam Water Discharge : उन्हाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विविध भागांतून शेतीसाठी पाण्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाचशे क्युसेकने कमी करण्यात आला आहे.

Team Agrowon

Sangli News : उन्हाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विविध भागांतून शेतीसाठी पाण्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाचशे क्युसेकने कमी करण्यात आला आहे.

सध्या २६०० क्युसेक विसर्ग केला जात असून टेंभू, ताकारी, म्हैसाळ या तीनही योजना कार्यान्वित आहेत. कर्नाटकात पाणी वाहून जाण्याने विसर्ग कमी करावा लागला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

कोयना धरण व्यवस्थापनाकडे सांगली पाटबंधारे विभागाने पाण्याची मागणी कमी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार धरणाच्या नदी विमोचक दरवाजातून ५०० क्युसेक विसर्ग कमी करण्यात आला आहे.

आता या दरवाजातून ५०० क्युसेक विसर्ग सुरू असून कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यातून २१०० क्युसेक विसर्ग केला जात आहे. विसर्ग २६०० क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे.

नदीतून पाण्याचा विसर्ग ३१०० क्युसेक सुरू होता. त्याचा परिणाम म्हणून कृष्णा नदीवरील बंधाऱ्यातून पाणी वाहून जात होते. म्हैसाळ बंधारा येथील पातळी १२ फुटांऐवजी १५ ते १६ फुटांवर पोहोचली होती.

त्यामुळे पाणी कमी करण्यात आले आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही. तसेच पाणी कमी केल्याने कोणताही विपरित परिणाम शेती किंवा शहर, गावांच्या पाण्यापुरवठ्यावर होणार नाही, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT